ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर
By Admin | Updated: July 2, 2017 02:08 IST2017-07-02T02:08:49+5:302017-07-02T02:08:49+5:30
ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास

ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील नान्ही फाट्याजवळील पुलावर घडली.
महेश रामदास बाळबुद्धे (२७) रा. गेवर्धा असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. महेश हा एमएच-३३-डी-४९६७ या क्रमांकाच्या वाहनाने कुरखेडावरून गेवर्धाकडे जात होता. दरम्यान विरूद्ध दिशेने एमएच-३३-एफ-१५८७ क्रमांकाची ट्रॅक्टर येत होती. नान्ही फाट्यावरील पुलावर ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात धडक बसली. यावेळी ट्रॅक्टरचे चाक महेश पायावरून गेल्याने महेशचा पाय तुटला. त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची नोंद कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.