गडचिरोलीत ट्रॅक्टर व बसची धडक; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:20 IST2020-05-14T19:19:21+5:302020-05-14T19:20:10+5:30

धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील कुलभट्टी येथे ट्रॅक्टर व बस यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली.

Tractor and bus collide in Gadchiroli; No casualties | गडचिरोलीत ट्रॅक्टर व बसची धडक; जिवीतहानी नाही

गडचिरोलीत ट्रॅक्टर व बसची धडक; जिवीतहानी नाही

ठळक मुद्देकुलभट्टीजवळ अपघातबसचा पत्रा निघून नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील कुलभट्टी येथे ट्रॅक्टर व बस यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली.
गडचिरोली आगारातून दरदिवशी सकाळी ७.३० वाजता धानोरा-मुरूमगाव मार्गे कोटगूलसाठी बस सोडली जाते. गुरूवारी प्रवाशी न मिळाल्याने सदर बस सकाळी १० वाजता गडचिरोली येथून रवाना करण्यात आली. बसमध्ये केवळ दोन प्रवाशी होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या बस आणि ट्रॅक्टरमध्ये एका बाजुने धडक झाली. यात बसचा एका बाजुचा पत्रा तुटला. बस चालक टुटे यांनी याबाबतची तक्रार सावरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

Web Title: Tractor and bus collide in Gadchiroli; No casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात