शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘लाल दहशती’च्या खुणा जमीनदोस्त! गडचिरोलीत अस्तित्वावरच प्रहार; माओवाद्यांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:09 IST

८०० जवानांची कारवाई, ४४ स्मारके एकाच दिवसात पाडली

गडचिरोली : माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक आणि त्यांच्या हिंसक चळवळीची साक्ष देणारी गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ४४ माओवादी स्मारके  जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने बुधवारी जमीनदोस्त केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेद्वारे माओवादी चळवळीच्या उरल्यासुरल्या अस्तित्वावर पोलिसांनी मोठा प्रहार केला असून, दुर्गम भागातील जनतेला दहशतीच्या छायेतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  येत्या मार्चअखरेपर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे.

अतिदुर्गम भागात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी माओवाद्यांकडून ठिकठिकाणी दगडी व सिमेंटची स्मारके उभारली जात होती. मात्र, बुधवारी पोलिसांनी या ‘दहशतीच्या खाणाखुणा’ पुसून काढण्यासाठी १८ पथके तैनात केली होती. यामध्ये सी-६०, सीआरपीएफ आणि  पोलिस दलाच्या सुमारे ८०० जवानांचा समावेश होता.

दहशतीचे बालेकिल्ले ढासळले!

माओवाद्यांचे अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा (जां.) यांसारख्या गावांमध्ये ही स्मारके तोडण्यात आली. ही केवळ बांधकामे नसून माओवाद्यांच्या हिंसक विचारांचा प्रचार करणारी केंद्रे होती. ती नष्ट झाल्यामुळे आता या भागातील ग्रामस्थांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

आम्ही  नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन करतोय. विकास होत असल्याने नक्षल्यांचा आधार संपत असून  २२ जणांचे आत्मसमर्पण हा याच बदलाचा एक भाग आहे.

किरण चव्हाण,

पोलिस अधीक्षक सुकमा, छत्तीसगड

कुठे किती स्मारके पाडली?

एटापल्ली       १८

हेडरी    १७

भामरागड       ०५

जिमलगट्टा     ०२

धानोरा  ०१

पेंढरी   ०१

बीडीडीएस पथकाकडून तपासणी

कोणतीही स्मारके उद्ध्वस्त करण्यापूर्वी माओवाद्यांनी तिथे आयईडी किंवा स्फोटके पेरली असण्याची शक्यता गृहीत धरून बीडीडीएस पथकांनी परिसराची कसून तपासणी केली.

२२ नक्षलींनी टाकली शस्त्रे

छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले. सुकमा जिल्ह्यात पोलिसांच्या प्रभावामुळे धास्तावलेल्या २२ नक्षलींनी एकाच वेळी आत्मसमर्पण केले. यात एका महिला नक्षलीचाही समावेश आहे.

नवे सुरक्षा कॅम्प, रस्त्यांचे जाळे,  दुर्गम भागापर्यंत पोहोचणाऱ्या विकासकामांनी नक्षली संघटनेचा पाया खिळखिळा केला आहे. आता हिंसेत काहीच उरले नाही, विकासच महत्त्वाचा आहे, अशी भावना आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांनी व्यक्त केली.

मोठा कट उधळला

सुकमा-बीजापूर सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला.

तालपेरू नदीच्या काठावर नक्षलवाद्यांनी लपवलेला ट्रॅक्टर आणि १० किलोचे ‘अँटी हँडलिंग आयईडी’ जवानांनी जप्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli: Maoist Memorials Demolished, Existence Challenged, Maoists Suffer Setback

Web Summary : Gadchiroli police demolished 44 Maoist memorials, symbols of violence, aiming to liberate villagers from fear. The operation, involving 800 personnel, targeted key Maoist strongholds. Chhattisgarh police reported 22 Maoist surrenders, highlighting the impact of development and security initiatives.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली