आजपासून काेविडमुक्त भागातील १६० शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:49+5:302021-07-15T04:25:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : शासन व प्रशासनाने केलेल्या उपाययाेजनांमुळे राज्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव आता बराच कमी झाला आहे. काेराेनाची ...

From today, classes of 160 schools in Kavid-free areas will be filled | आजपासून काेविडमुक्त भागातील १६० शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार

आजपासून काेविडमुक्त भागातील १६० शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : शासन व प्रशासनाने केलेल्या उपाययाेजनांमुळे राज्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव आता बराच कमी झाला आहे. काेराेनाची परिस्थिती सुधारल्यामुळे राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाच्या ७ जुलै २०२१ च्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यातील काेविडमुक्त भागातील १६० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग गुरूवार दि.१५ जुलैपासून प्रत्यक्षात भरणार आहेत. त्यामुळे या शाळांमधील आठवी ते बारावीच्या वर्गात पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे.

काेविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा बंद आहेत. परिणामी गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. या वर्षीच्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभसुद्धा ऑनलाइन पद्धतीने २८ जूनपासून झाला आहे. शिक्षक व कर्मचारी शाळांमध्ये जात आहेत. मात्र विद्यार्थी घरी आहेत. विद्यार्थ्यांविना शाळा सुरू असल्या तरी त्या नाममात्र आहेत.

गडचिराेली जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. कव्हरेजच्या समस्येमुळे ऑनलाइन शिक्षणाचा बऱ्याच ठिकाणी बट्ट्याबाेळ झाला आहे. दरम्यान विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून वर्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचा विचार करून शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास परवानगी दिली आहे.

बाॅक्स...

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - २५५

उच्च माध्यमिक शाळा - १३९

वर्ग भरणाऱ्या शाळांची संख्या - १६०

बाॅक्स...

अशी आहे ग्रामस्तरावरील समिती

काेविडमुक्त गावातील शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्यासाठी तेथील ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव असणे गरजेचे आहे. यासाठीची प्रक्रिया राबविण्याकरिता ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, असे ७ जुलै २०२१ च्या जीआरमध्ये नमूद आहे. शाळा सुरू हाेणाऱ्या गावांमध्ये अशा समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, निमंत्रित सदस्य म्हणून प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक तसेच मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

बाॅक्स...

खबरदारीबाबत या आहेत अटी

- संबंधित गावात गेल्या महिनाभरापासून काेविड रुग्ण आढळून आलेला नसावा.

- गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

- एखादा विद्यार्थी काेविडग्रस्त आढळून आल्यास तत्काळ शाळा बंद करून मुख्याध्यापकांनी शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावे.

- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बाेलविण्यात यावे.

- दरराेज ५० टक्के विद्यार्थी आळीपाळीने शाळेत बाेलवावे.

- एका बाकावर एकच विद्यार्थी, दाेन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे.

- सतत हात साबणाने धुवावेत, मास्कचा वापर करावा.

बाॅक्स...

पर्यवेक्षीय यंत्रणा थेट शाळांवर पाेहाेचणार

शासनाच्या निर्णयानुसार काेविडमुक्त गावातील शाळांचे इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू हाेणार आहेत. गुरुवारला शिक्षक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी शाळेत दाखल हाेणार आहेत. शाळा सुरू करताना काय खबरदारी घेण्यात आली, सर्व शिक्षक, कर्मचारी शाळेत पाेहाेचले काय, अध्ययन, अध्यापन प्रक्रिया कशी चालली, याबाबतचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी थेट शाळांवर पाेहाेचणार आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख शाळांना भेटी देणार आहेत. याअनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी तसे आदेश काढले आहेत.

बाॅक्स....

शहरी भागातील शाळांबाबत अनिश्चितता

७ जुलै २०२१ च्या जीआरनुसार ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत, गावस्तरावरील समिती व शाळा व्यवस्थापन समित्यांनी करावयाची कार्यवाही व मार्गदर्शन तत्त्वे शासनाने दिली आहेत. मात्र शहरी भागातील शाळा सुरू कराव्यात की नाही, याबाबत या जीआरमध्ये कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी, शिक्षक, पालक बुचकळ्यात पडले आहेत. शिक्षण विभागानेही त्याबाबत स्पष्ट सूचना दिली नसल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांना तूर्त ऑनलाइन वर्गावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

काेट....

काेविडमुक्त गावातील १६० शाळा सुरू करण्याबाबतचे ठराव आले असून या शाळांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग ५० टक्के उपस्थितीने सुरू हाेणार आहेत. शहरी भागातील शाळांबाबत जीआरमध्ये उल्लेख नाही. मात्र आपण शहरी भागातील शाळा सुरू करण्यासाठी पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका बाेलावून चर्चा घडवून आणणार आहोत. यासाठी पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू करण्याचा प्रयत्न राहील.

- आर.पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प. गडचिराेली

Web Title: From today, classes of 160 schools in Kavid-free areas will be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.