शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून काेविडमुक्त भागातील 160 शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

काेविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा बंद आहेत. परिणामी गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. या वर्षीच्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभसुद्धा ऑनलाइन पद्धतीने २८ जूनपासून झाला आहे. विद्यार्थ्यांविना शाळा सुरू असल्या तरी त्या नाममात्र आहेत.

ठळक मुद्देआठवी ते बारावीच्या वर्गांमध्ये किलबिलाट : ग्रामपंचायती व शाळांनी घेतला ठराव

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासन व प्रशासनाने केलेल्या उपाययाेजनांमुळे राज्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव आता बराच कमी झाला आहे. काेराेनाची परिस्थिती सुधारल्यामुळे राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाच्या ७ जुलै २०२१ च्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यातील काेविडमुक्त भागातील १६० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग गुरूवार दि.१५ जुलैपासून प्रत्यक्षात भरणार आहेत. त्यामुळे या शाळांमधील आठवी ते बारावीच्या वर्गात पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे.काेविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा बंद आहेत. परिणामी गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. या वर्षीच्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभसुद्धा ऑनलाइन पद्धतीने २८ जूनपासून झाला आहे. विद्यार्थ्यांविना शाळा सुरू असल्या तरी त्या नाममात्र आहेत. गडचिराेली जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. कव्हरेजच्या समस्येमुळे ऑनलाइन शिक्षणाचा बऱ्याच ठिकाणी बट्ट्याबाेळ झाला आहे. दरम्यान विद्यार्थी व पालकांच्या मागणीचा विचार करून वर्ग सुरू करण्यास मुभा दिली आहे.

शहरी भागातील शाळांबाबत अनिश्चितता- ७ जुलै २०२१ च्या जीआरनुसार ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत, गावस्तरावरील समिती व शाळा व्यवस्थापन समित्यांनी करावयाची कार्यवाही व मार्गदर्शन तत्त्वे शासनाने दिली आहेत. मात्र शहरी भागातील शाळा सुरू कराव्यात की नाही, याबाबत या जीआरमध्ये कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी, शिक्षक, पालक बुचकळ्यात पडले आहेत. शिक्षण विभागानेही त्याबाबत स्पष्ट सूचना दिली नसल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांना तूर्त ऑनलाइन वर्गावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

खबरदारीबाबत या आहेत अटी

- संबंधित गावात गेल्या महिनाभरापासून काेविड रुग्ण आढळून आलेला नसावा.- गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.- एखादा विद्यार्थी काेविडग्रस्त आढळून आल्यास तत्काळ शाळा बंद करून मुख्याध्यापकांनी शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावे.- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बाेलविण्यात यावे.- दरराेज ५० टक्के विद्यार्थी आळीपाळीने शाळेत बाेलवावे.- एका बाकावर एकच विद्यार्थी, दाेन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे.- सतत हात साबणाने धुवावेत, मास्कचा वापर करावा.

अशी आहे ग्रामस्तरावरील समिती- काेविडमुक्त गावातील शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्यासाठी तेथील ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव असणे गरजेचे आहे. यासाठीची प्रक्रिया राबविण्याकरिता ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, असे ७ जुलै २०२१  च्या जीआरमध्ये नमूद आहे. शाळा सुरू हाेणाऱ्या गावांमध्ये अशा समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, निमंत्रित सदस्य म्हणून प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक तसेच मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या