शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पागड व चपराळा अभयारण्य रखडले

By admin | Updated: May 5, 2016 00:16 IST

महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू किंवा देवखार (जायंट स्क्विरल) सह असंख्य दुर्मिळ वन्यजीव व वनस्पती असलेल्या चपराळा, भामरागड अभयारण्याचा विकास अद्यापही रखडलाच आहे़ ....

विकासाबाबत नियोजनच नाही : वन विभागाचेही प्रयत्न शासनदरबारी पडत आहे अपुरेगडचिरोली : महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू किंवा देवखार (जायंट स्क्विरल) सह असंख्य दुर्मिळ वन्यजीव व वनस्पती असलेल्या चपराळा, भामरागड अभयारण्याचा विकास अद्यापही रखडलाच आहे़ या जंगलातील नक्षलवाद्यांची दहशत, वन्यजीव व सागवन तस्करांचे वर्चस्व आणि शासन स्तरावरील उदासीनतेचे ग्रहण लागल्यामुळे समृद्ध जैवविविधता लाभलेली ही अभयारण्ये केवळ नकाशावरच आहेत़घनदाट वनराई आणि दुर्मिळ वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन व वन्यजीव संवर्धनासाठी भामरागड आणि चपराळा अभयारण्याची घोषणा करण्यात आली़ भामगराड तालुक्यातील भामरागड हे अभयारण्य अहेरी तालुक्यापासून १०२ कि़मी़ अंतरावर आहे़ १०४़ ३८ चौ़ कि़मी़ प्रदेशातील या अभयारण्यात राज्य प्राणी शेकरू, उडणारी खार, वाघ, बिबट, अस्वल, भेडकी किंवा भेकर, धनेश (ग्रेट पाईड हॉर्नबिल) अशा दुर्मिळ प्राणी, पक्ष्यांचे व आग्यामण्यार (बँडेड क्रेट) या जहाल विषारी पण, अतिदुर्मिळ सापांचे वास्तव्य आहे़ येथून पुढे सिरोंचातील नदी परिसरात जॉर्डनचा कोर्सर हा दुर्मिळ पक्षी आहे़ त्याचप्रमाणे आष्टीजवळचे चपराळा अभ्यारण्य वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे़ येथेही शेकरू, उडणारी, वाघ, बिबट व अनेक वन्यजीव, सरीसृप आहेत़ काही वर्षांपूर्वी या भागात काळवीट असल्याच्याही नोंदी आहेत़ मात्र आता ते दिसत नाहीत़ या दोन्ही अभयारण्यात वाघांचे अस्तीत्व असले, तरी ते फारसे आढळत नाहीत़ मुळात नक्षल्यांच्या भीतीने या दोन्ही अभयारण्याच्या घनदाट भागात वनाधिकारी किंवा कर्मचारी फारसे फिरत नाहीत़ हे पर्यटनासाठी उत्तम स्थळ असले, तरी पायाभूत सुविधांअभावी व नक्षल्यांच्या हिंसक घटना कानावर पडत असल्याने पर्यटकही येथे येण्यास धजावत नाहीत़ त्यांना येथे सुरक्षित वातावरण व सुविधा देण्यात शासनाला यश आले नाही़ चपराळा अभयारण्यात काही प्रमाणात पर्यटक येतात़ पण, यातील बहुतांश प्रशांतधाम मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविकच असतात़ विशेष म्हणजे या अभयारण्यातून चक्क आष्टी, अहेरी मार्ग गेला आहे़ त्यामुळे कोणतेही तस्कर या रस्त्याने अभयारण्यात सहज प्रवेश करू शकतात़ त्यामुळे येथील संरक्षण व्यवस्था कुचकामी ठरली आहे़ १९९६-९७ मध्ये या भाग पूर्ण संरक्षित करण्याासाठी नदीच्या पलीकडील व रस्त्याच्या एकाच बाजूचे वनक्षेत्र निर्धारित करण्याचे प्रयत्न झाले होते़ मात्र, त्यासाठी शासकीय नियमांमधून मार्ग काढून चिकाटीने पाठपुरावा करण्याची गरज होती़ ती चिकाटी कुणीच दाखवली नाही़ त्यामुळे हे अभयारण्य कोणत्याही दृष्टीने अभयारण्य वाटत नाही़ कोणतेही अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प विकसित होण्यासाठी पर्यटन व त्यातून आर्थिक चक्र गतिमान करणे आवश्यक आहे़ एकीकडे नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगाच्या नकाशावर झळकत असताना गडचिरोली जिल्ह्यातील ही दोन्ही अभयारण्ये अद्यापही उपेक्षितच आहेत़ (शहर प्रतिनिधी)टिप्पागड अभयारण्य दिवास्वप्नच़़़गडचिरोली वनविभागाने कोरची तालुक्यातील टिप्पागड येथे अभयारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे़मात्र, भामरागड व चपराळा अभयारण्याची अवस्था बघता केवळ कागदोपत्री अभयारण्य घोषीत करून काहीच साध्य होणार नाही, हे माहीत असल्याने आता वनविभागानेच या अभयारण्यासाठी प्रयत्न सोडून दिले आहेत़ संरक्षित वनामुळे वन्यजीवांचे संरक्षण होऊ शकणार नाही़ उलट आज या वनांतून निर्धास्तपणे बांबू, तेंदू, मोह आदी वनोपज गोळा करणाऱ्या आदिवासींवर नियमांचे बंधन येईल़ त्यामुळे ‘नकोच ते अभयारण्य’ असा सूर उमटत आहे़