विहीरगाव परिसरात वाघाचा धूमाकूळ

By Admin | Updated: August 6, 2015 02:15 IST2015-08-06T02:15:26+5:302015-08-06T02:15:26+5:30

देसाईगंज तालुक्यातील मोहटोला/ किन्हाळापासून जवळच असलेल्या विहीरगाव परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ...

The tigers of the tigers in Vihirurga area | विहीरगाव परिसरात वाघाचा धूमाकूळ

विहीरगाव परिसरात वाघाचा धूमाकूळ

तीन शेळ्या, एक वासरू ठार : नागरिक प्रचंड भयभीत
मोहटोला/किन्हाळा : देसाईगंज तालुक्यातील मोहटोला/ किन्हाळापासून जवळच असलेल्या विहीरगाव परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला असून हल्ला चढवून दोन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. परिणामी वाघ या भागात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विहीरगाव येथे वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक कार्यालय आहे. विहीरगाव ते देऊळगाव, शिरपूर, भगवानपूरपर्यंत विस्तीर्ण स्वरूपाचा जंगल आहे. लगतच झुडुपी जंगलदेखील आहे. या विस्तीर्ण व झुडुपी जंगलाचा आधार घेऊन या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. या भागात चार ते पाच वाघ वास्तव्याला असल्याची माहिती नागरिकांकडून प्राप्त झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी विहीरगाव येथील मधुकर शेंडे यांची एक शेळी तर मंगळवारच्या रात्री सुखदेव शंभरकर यांच्या दोन शेळ्या वाघाने फस्त केल्या. त्यापूर्वी चिखली, तुकूम येथे वाघाने एका वासराला ठार केले. जंगलातील वाघ रात्रीच्या सुमारास गावात येऊन गुरा, ढोरांवर हल्ला चढवित असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. (वार्ताहर)
वन विभागाने बंदोबस्त करावा
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंज वन विभागांतर्गत धानोरा, वैरागड, आरमोरी, विहीरगाव भागात वाघ व बिबट्याने धुमाकूळ घालून अनेक पाळीव जनावरांना ठार केले आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांवर अरिष्ट ओढवले आहे. वन विभागाने वाघ शोध चमू लावून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The tigers of the tigers in Vihirurga area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.