शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाघांचा धुमाकूळ अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

जीवन जुवारे(५५) रा. राजगाटा चेक असे जखमीचे नाव आहे. जुवारे हे इतर सहा शेतकऱ्यांसाेबत शेतशिवारात बैल चारत हाेते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडूपांमध्ये वाघ लपून बसला हाेता. जुवारे हे झुडुपांजवळ गेले असता वाघाने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात जुवारे हे जमिनीवर काेसळले. त्यानंतर पुन्हा वाघाने त्यांच्या छातीवर पंजा मारला. त्यामुळे जुवारे यांना पाठीवर व छातीवरही जखम झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली व आरमाेरी तालुक्यात वाघांचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी गडचिराेली तालुक्यातील राजगाटा चेक येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात ताे गंभीर जखमी झाला. तर गुरुवारी आरमाेरी तालुक्यातील नरचुली येथे गायींच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. प्रत्येक दिवशी नागरिक व पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले हाेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवन जुवारे(५५) रा. राजगाटा चेक असे जखमीचे नाव आहे. जुवारे हे इतर सहा शेतकऱ्यांसाेबत शेतशिवारात बैल चारत हाेते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडूपांमध्ये वाघ लपून बसला हाेता. जुवारे हे झुडुपांजवळ गेले असता वाघाने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात जुवारे हे जमिनीवर काेसळले. त्यानंतर पुन्हा वाघाने त्यांच्या छातीवर पंजा मारला. त्यामुळे जुवारे यांना पाठीवर व छातीवरही जखम झाली. वाघाने हल्ला करताच साेबत असलेल्या शेेतकऱ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघ पळून गेला व जुवारे यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी राजगाटा चेक येथीलच शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र ताे व्यक्ती झाडावर चढल्याने त्याचे प्राण वाचले. 

गायींनी वाघाला लावले पळवून 

रांगी: आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नरचुली येथील पशुपालकांच्या गायी गुरुवारी दुपारी जंगल परिसरात चरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने गायींच्या कळपावर हल्ला करून एका गायीला पकडले. यावेळी इतर गायींनी वाघावर जाेरदार हल्ला चढविला. यामुळे भयभीत झालेल्या वाघाने पळ काढला. ज्या गायीला वाघाने पकडले हाेते ती गाय गंभीर जखमी झाली. काही वेळाने ती मरण पावली. 

याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली. ज्या ठिकाणी गाय ठार झाली, त्या परिसरात कॅमेरा लावून ठेवण्यात आला आहे. वाघाची शिकार ठरलेली गाय नरचुली येथील जितेंद्र गेडाम यांच्या मालकीची आहे. वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ