शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

घनदाट जंगलात जवानांचं थरारक ऑपरेशन; येत्या मार्चपूर्वी गडचिरोली होणार नक्षलमुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 10:01 IST

त्या ७ माओवाद्यांवर होते ७१ लाखांचे बक्षीस, भामरागडच्या फोदेवाडा जंगलात ३ फेब्रुवारीपासून सी-६० पथकाच्या १४ तुकड्यांमार्फत माओवादविरोधी अभियान सुरू झाले

गडचिरोली - अबुझमाडच्या घनदाट जंगलात जवान व माओवाद्यांतील चकमकीच्या थरारनाट्याचा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उलगडा केला. सलग तीन दिवस व तीन रात्री घनदाट जंगलात जिवाची पर्वा न करता जवानांनी शौर्य दाखवीत माओवाद्यांवर मात केली. सातही मृत माओवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर सुमारे ७१ लाखांचे इनाम होते.

भामरागडच्या फोदेवाडा जंगलात ३ फेब्रुवारीपासून सी-६० पथकाच्या १४ तुकड्यांमार्फत माओवादविरोधी अभियान सुरू झाले. ४ रोजी माओवाद्यांनी गोळीबार केला, त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन तळ उद्ध्वस्त केले. ५ व ६ रोजी अधूनमधून धुमश्चक्री सुरूच होती. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा व माओवादी साहित्यदेखील आढळून आले. जवानांनी तब्बल पाच हजार, तर माओवाद्यांनीही आठशे गोळ्या झाडल्या. येत्या मार्चपूर्वी गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल, असा विश्वास नीलोत्पल यांनी व्यक्त केला.

९९ माओवाद्यांचा खात्मा

दरम्यान, २०२१ पासून आतापर्यंत तब्बल २९ माओवाद्यांना ठार करण्यात आले, तर १४० जणांना अटक केली. १५३ जणांनी आत्मसमर्पण केले. उर्वरित माओवाद्यांनी शस्त्रत्या करावे, असे आवाहन नीलोत्पल यांनी केले आहे.

ठार झालेले माओवादी असे

दंडकारण्य स्पेशल झोनल सदस्या, व कंपनी क्र. १० चा ब्यूरो प्रभाकर ऊर्फ लोकेती चंदरराव (५७, रा. इरसरोजीवाडा, जि. कामारेड्डी, तेलंगणा).कंपनी क्र. ५ चा कमांडर पागु मोड्याम (३०, रा. डल्ला, ता. आवापल्ली जि. बिजापूर, छत्तीसगड), प्रभाकरची गार्ड अनिला उर्फ बुदरी कोवाची (२४, रा. सुकमा, छत्तीसगड), स्पेशल प्लाटून कमांडर कामेश पदा (३५, रा. दरबा, जि. सुकमा, छत्तीसगड), परालकोट दलमचा एसीएम भजनाथ उर्फ भीमा होळी (४०, रा. टेकालगुडेम, ता. कोंटा, जि. सुकमा, छत्तीसगड), कंपनी क्र. १० ची सदस्य मंगली कुरसाम (३०, रा. पश्चिम बस्तर, छत्तीसगड) आणि कंपनी क्र. ५ चा सदस्य जोगी सोढी- मडावी (२७, रा. बुडगीचेरू, जि. बिजापूर, छत्तीसगड)

शहीद मडावींना मदत...वीरगती प्राप्त झालेले जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २.२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचीही घोषणा करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli Operation: Naxal-Free by March, 99 Maoists Eliminated So Far

Web Summary : Gadchiroli police achieved a major breakthrough in anti-Naxal operations in Abujhmadh forest. Seven Maoists were killed, with ₹71 lakh reward on them. Since 2021, 99 Maoists have been killed and 153 surrendered. Gadchiroli aims to be Naxal-free by March.
टॅग्स :naxaliteनक्षलवादी