शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! घरच्यांचा विरोध पत्करून केला प्रेमविवाह; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:26 IST

Gadchiroli : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा पेट्रोल टाकून, जाळून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पोर्ला येथे २२ जानेवारी रोजी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा पेट्रोल टाकून, जाळून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पोर्ला येथे २२ जानेवारी रोजी उघडकीस आली. नातेवाईकांचा विरोध पत्करून तसेच रुढी-परंपरेची बंधने तोडून ज्याच्याशी लग्नाची रेशीमगाठ बांधली, तो पतीच तिच्यासाठी काळ ठरला. एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पत्नीचा उपचारादरम्यान नागपूरमध्ये मृत्यू झाला. सात जन्म सोबत निभावण्याच्या आणाभाका सात वर्षांतच तुटल्या आणि हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. त्यांच्या दोन चिमुकल्या आई-वडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांका सुशील बारसागडे (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे माहेर चंद्रपूर जिल्ह्यातील निलसनी पेडगाव (ता. सावली) हे आहे. २०१८ मध्ये प्रियांका व सुशील यांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. सुशील मोलमजुरीचे काम करायचा. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्याला दारूचे व्यसन जडल्याने घरात वाद होऊ लागला. १६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ च्या सुमारास सुशीलने दारू पिण्यासाठी प्रियांकाकडे पैशांची मागणी केली. प्रियांकाने विरोध करताच त्याने तिला बेदम मारहाण केली आणि कपाटातील २००० रुपये हिसकावून नेले.

तो काही वेळाने पुन्हा घरी परतला. यावेळी प्रियांका स्वयंपाकघरात काम करत होती. सुडाने पेटलेल्या सुशीलने मागून येऊन प्रियांकाच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडी लावून तिला पेटवून दिले. प्रियांकाने जीवाच्या आकांताने आक्रोश केल्याने तिची मोठी मुलगी सुप्रिया (वय ५) हिने मोठ्याने रडण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून शेजारी धावून आले, तोपर्यंत ती ४० ते ५० टक्के भाजली होती.

आरोपीने स्वतःच तिच्या अंगावर चादर टाकून आग विझविण्याचा बनाव केला, प्रियांकाला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, नंतर नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले, प्रकृती खालावल्याने खासगी दवाखान्यात हलविले. मात्र, २० जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. उपचार सुरु असताना वडील अशोक बोलदवार यांच्याकडे तिने घटनाक्रम सांगितला, वडिलांच्या फिर्यादीवरून गडचिरोली ठाण्यात सुशील चिंटुजी बारसागडे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

इकडे पतीला अटक, तिकडे पत्नीवर अंत्यसंस्कार

  • २१ जानेवारी रोजी मृत प्रियांकावर माहेरी निलसनी पेडगाव (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथे अंत्यसंस्कार पार पडले, त्याचवेळी पोर्ला गावातून पती सुशील बारसागडे यास गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • अंत्यसस्कारावेळी प्रियांकाचे आई-वडील व दोन विवाहित बहिणी शोकमग्न झाल्या होत्या. सुशील बारसागडे यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पो.नि. विनोद चव्हाण यांनी दिली.

 

मोठी लेक आजोळी, धाकटी दवाखान्यात !

  • मृत प्रियांकाला पाच वर्षांची सुप्रिया व अवघ्या तीन महिन्यांची सुहानी या दोन मुली आहेत. वडिलांनी आईला संपविले. आता आईच्या हत्येच्या आरोपाखाली वडील तुरुंगात गेले.
  • सुशील बारसागडे यास आई-वडील नाहीत. प्रियांकाचे आई-वडील वयोमानाने थकलेले आहेत. त्यामुळे दोन लेकी जन्मदात्यांच्या प्रेमाला पोरक्या झाल्या असून, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • सध्या मोठी मुलगी सुप्रिया ही आजोळी असून, तीन महिन्यांची सुहानी जिल्हा रुग्णालयातील शिशुगृहात उपचार घेत आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Man Kills Wife for Alcohol Money After Love Marriage.

Web Summary : In Gadchiroli, a man murdered his wife by setting her ablaze after she refused to give him money for alcohol. The couple had a love marriage against family wishes. The victim succumbed to her injuries after a month, leaving behind two young daughters.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोलीDomestic Violenceघरगुती हिंसा