शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन ट्रक साहित्य भामरागड पूरग्रस्तांसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इतरांना मदत करणे चुकीचे ठरेल, ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आली.

ठळक मुद्देविद्यापीठाचा उपक्रम : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी; मदतीसाठी पुढे येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाने सातारा, सांगली, कोल्हापूरपूरग्रस्तांसाठी १५ दिवसांपूर्वी मदत गोळा केली होती. मात्र भामरागड तालुक्यातच पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने सदर मदत भामरागड पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखविली. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इतरांना मदत करणे चुकीचे ठरेल, ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आली. विद्यापीठाने सातारा, सांगली पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केलीच होती. हीच मदत भामरागड पूरग्रस्तांना पाठविण्यात आली आहे. कपडे, दैनंदिन साहित्य, जीवनोपयोगी वस्तूंनी भरलेले सुमारे तीन ट्रक भामरागडकडे रवाना झाले आहेत. कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्र-कुलगुरू डॉ. ईश्वर मोहुर्ले, रासेयो संचालक डॉ. महेश मडावी, जिल्हा समन्वयक डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. विजया गेडाम यांच्या मार्गदर्शनात सुमारे ६५ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सदर मदत गोळा केली होती.येथील अबोल आदिवासी स्वत:च्या दु:खाचा देखावा करू शकत नसले म्हणून त्यांचे दु:ख निश्चितच कमी नाही. विद्यापीठाप्रमाणे जिल्हाभरातील शाळा व सामान्य नागरिकांनी सुध्दा मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :floodपूर