एका बंदुकीसह तीन जिवंत काडतुसे जप्त

By Admin | Updated: April 20, 2017 01:59 IST2017-04-20T01:59:20+5:302017-04-20T01:59:20+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सिरोंचा पोलिसांनी बुधवारी सकाळी ११ .३० ते १२ च्या सुमारास

Three live cartridges seized with a gun | एका बंदुकीसह तीन जिवंत काडतुसे जप्त

एका बंदुकीसह तीन जिवंत काडतुसे जप्त

 ५० हजारांची रोकड पकडली : सिरोंचा पोलिसांची कारवाई
सिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सिरोंचा पोलिसांनी बुधवारी सकाळी ११ .३० ते १२ च्या सुमारास सिरोंचा येथील नरसिंगराव सिलवेरी याच्याकडून विनापरवाना एक पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच त्याच्याकडून ५० हजारांची रोकड हस्तगत केली आहे.
नरसिंग सिलवेरी यांचे तहसील कार्यालयांच्या मार्गावर राजीव चौकात इलेक्ट्रिकल साहित्य दुरूस्तीचे दुकान आहे. तो पिस्तुल विक्रीचे काम करतो, अशी गुप्त माहिती सिरोंचा पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी मोरक्या पाठवून दुकानात धाड टाकली. यावेळी नरसिंगराव सिलवेरी याचेकडून एक पिस्तोल, तीन जीवंत काडतुसे तसेच ५० हजाराची रोकड जप्त करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती सिरोंचाचे पोलीस अधिकारी पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three live cartridges seized with a gun