तीन लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:34+5:302021-03-29T04:22:34+5:30
बाॅक्स मागणी एवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खाेडा सध्या गडचिराेली आराेग्य विभागाकडे २३ हजार काेराेना प्रतिबंधात्मक लसचा साठा उपलब्ध ...

तीन लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण
बाॅक्स
मागणी एवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खाेडा
सध्या गडचिराेली आराेग्य विभागाकडे २३ हजार काेराेना प्रतिबंधात्मक लसचा साठा उपलब्ध आहे. दर दिवशी सरासरी एक हजार लस दिल्या जातात. म्हणजेच उपलब्ध लस २३ दिवस पुरणार आहेत. १ एप्रिलपासून लस घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे लसचा अतिरिक्त साठा ठेवावा लागणार आहे.
बाॅक्स .....
५० केंद्रांवर तीनच दिवस लसीकरण
सध्या ६४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. जिल्हा रुग्णालय, महिला व बालरुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर असलेल्या ५० केंद्रांवर साेमवार, बुधवार व गुरुवार या तीनच दिवशी लसीकरण केले जाते. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण हाेणार आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्राथमिक आराेग्य केंद्रांवरही आठवड्याचे सहा दिवस लसीकरण करावे, अशी मागणी आहे. उर्वरित १४ केंद्रांवर शासकीय सुटीवगळता लसीकरण केले जाते.