शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

जागेअभावी तीन इमारती रखडल्या

By admin | Updated: August 23, 2014 01:47 IST

जिल्हा परिषदेच्यावतीने २०१३-१४ या वर्षात श्रेणी १ चे मुरमाडी, पळसगाव बोलेपल्ली या तीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली.

दिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्हा परिषदेच्यावतीने २०१३-१४ या वर्षात श्रेणी १ चे मुरमाडी, पळसगाव बोलेपल्ली या तीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. मात्र या इमारतीसाठी संबंधीत गावात जागा उपलब्ध नसल्याने तिनही पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती तात्पुरत्या रखडल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. जिल्हा निर्मितीपासून ३२ वर्षाचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील तब्बल ३६ पशुवैद्यकीय दवाखाने भाड्याच्याच घरात असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त श्रेणी १ चे ९२, श्रेणी २ चे ३९ व फिरते पशुचिकित्सालय ७ असे एकूण १३८ पशुवैद्यकी दवाखाने आहेत. या दवाखान्याच्या माध्यमातून गुराढोरांना औषधोपचार दिल्या जातो. मात्र गेल्या ३२ वर्षापासून ३६ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती भाड्याच्या इमारतीत आहेत. यामुळे दवाखान्यात पुरेसा औषधसाठा ठेवण्यासाठी अडचण जात आहे. तसेच निवासस्थानाअभावी अनेक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच कर्मचारी मुख्यालयी राहण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. स्वतंत्र प्रशस्त इमारतीअभावी दुर्गम भागातील गुराढोरांवर वेळेवर पुरेसा औषधोपचार करण्यास पशुसंवर्धन विभाग अपयशी ठरत आहे. जिल्ह्यात श्रेणी १ चे ५४ पशुसंवर्धन दवाखान्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र इमारती उभारल्या आहेत. तर श्रेणी १ च्या ४ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या चारही इमारती शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खुल्या करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. नव्या इमारतीमध्ये गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब, आरमोरी तालुक्यातील कोरेगाव रांगी, कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी, धानोरा तालुक्यातील सुरसुंडी, रांगी व मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा समावेश आहे. जिल्हा निर्मितीपासून ३६ पशुवैद्यकीय दवाखान्यांना स्वतंत्र इमारती नाही. यात श्रेणी १ चे मुरमाडी, पळसगाव, येंगलखेडा, कोटरा, ग्यारापत्ती, चातगाव, गट्टा, गोडलवाही, झाडापापडा, मुधोली, तुमडी, जामगिरी, चौडमपल्ली, बोलेपल्ली, मोहुर्ली, दोलंदा, कोटमी, कचलेर, तोडसा, तोडगटा, बिडरी, कमलापूर, खेमनचेरू, नागेपल्ली, आवलमरी, इंदाराम, गुड्डीगुडम, किष्टापूर, मेडपल्ली, दामरंचा, कोलामाल, सोमनपल्ली तसेच श्रेणी २ चे गट्टा, हेडरी, राजाराम, बामणी आदी पशुवैद्यकीय दवाखान्यांचा समावेश आहे. स्वतंत्र इमारती नसल्याने या गाव परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरावर औषधोपचार करण्यास अडचण जात आहे. स्वतंत्र इमारती उभारण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.