विद्युत प्रवाहाने तीन अस्वलांची शिकार

By Admin | Updated: October 27, 2016 01:38 IST2016-10-27T01:38:13+5:302016-10-27T01:38:13+5:30

विद्युत प्रवाह लावून तीन इसमांनी तीन अस्वलांची शिकार केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील सोनपूर येथील कक्ष क्रमांक २०६ च्या जंगलात

Three bear bear bulls in electric current | विद्युत प्रवाहाने तीन अस्वलांची शिकार

विद्युत प्रवाहाने तीन अस्वलांची शिकार

सहकारी संस्था संकटात : ३६ लाखांचे कमिशन थकीत
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळामार्फत सन २०१५-१६ यावर्षात खरीप हंगामात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत एकूण ३४ कोटी ८४ लाख ५० हजार ८३० रूपये किंमतीच्या २ लाख ४७ हजार ५५२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र या धान खरेदीपोटी सहकारी संस्थांना द्यावयाची कमिशनची रक्कम वर्ष उलटूनही प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोेली अधिनस्त असलेल्या कुरखेडा तालुक्यातील ११ संस्थांनी ११ धान खरेदी केंद्रावरून २०१५-१६ च्या खरीप हंगामात एकूण १० कोटी २७ लाख ३७ हजार रूपये किंमतीच्या ७३ हजार २०३ क्विंटल धानाची खरेदी केली. धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रतिक्विंटल २५ रूपये दिले जातात. मात्र राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाला वर्षभरापासून निधी न दिल्याने सहकारी संस्थांचे लाखो रूपयांचे कमिशन थकीत आहे. कुरखेडा तालुक्यातील ११ संस्थांचे सन २०१५-१६ वर्षातील १० लाख ९८ हजार रूपये प्रलंबित आहेत.
आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ११ सहकारी संस्थांनी ६ कोटी ६५ लाख ५२ हजार ३८२ रूपये किंमतीच्या ४७ हजार २३९ क्विंटल धानाची खरेदी केली. या धान खरेदीपोटी १० सहकारी संस्थांचे ७० लाख रूपये कमिशनपोटी आदिवासी विकास महामंडळाकडे प्रलंबित आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ८ सहकारी संस्थांनी चालू वर्षात ५ कोटी ५१ लाख २९ हजार ५०५ रूपये किंमतीच्या ३९ हजार क्विंटल धानाची खरेदी केली. या धान खरेदीपोटी ५८ लाख ६ हजार रूपये सहकारी संस्थांचे प्रलंबित आहेत. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १२ सहकारी संस्थांनी चालू वर्षाच्या खरीप हंगामात ९ कोटी ३४ लाख १४ हजार ८३४ रूपये किंमतीच्या ६६ हजार २९७ क्विंटल धानाची खरेदी केली. या धान खरेदीपोटी सदर सहकारी संस्थांचे ९ लाख ९४ हजार ४५९ रूपये कमिशनपोटी आदिवासी विकास महामंडळाकडे प्रलंबित आहेत.
राज्य शासन संस्थांच्या कमिशनची रक्कम अदा करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाला अनुदान देत नसल्याने कुरखेडा तालुक्यातील वडेगाव, आंधळी, कढोली, गोठणगाव, सोनसरी, गेवर्धा, पलसगड, देऊळगाव, घाटी, कुरखेडा तसेच आरमोेरी तालुक्यातील अंगारा, देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल, मौशिखांब, चांदाळा, पोटेगाव, पिंपळगाव व उराडी या संस्था प्रचंड आर्थिक संकटात सापडल्या आहेत. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी, रांगी, कारवाफा, मोहली, सुरसुंडी, गट्टा, धानोरा तसेच कोरची तालुक्यातील रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, पुराडा, खेडेगाव, कोरची, बेतकाठी, मुसेली, बोरी, बेडगाव, ग्यारापत्ती, मर्केकसा आदी सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Three bear bear bulls in electric current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.