शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

गडचिराेली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिराेली येथील स्थानिक गुन्हे शाखेने चामोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा कुदरसी टोला येथे ...

गडचिराेली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिराेली येथील स्थानिक गुन्हे शाखेने चामोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा कुदरसी टोला येथे धाड टाकून राजू घोती याच्या घरून तस्करी होणाऱ्या खवल्या मांजराचा जीव वाचविला आणि तीन आराेपींना ताब्यात घेतले.

बाहेरच्या राज्यातील इसम येवून निशाचर वन्यजीव प्राणी खवल्या मांजराची विक्री करणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करुन ही कारवाई यशस्वीरित्या केली.

कुदरसी टोला येथे पाेहाेचून राजू घोती याच्या घरी जाऊन माहिती घेतली असता तेथे इरफान इनीयास सैफी रा. धुंगराला (उत्तरप्रदेश) हा सध्या गडचिरोली येथील गोकुलनगर येथे राहतो. हा संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला या संदर्भात विचारपूस केली असता, त्याने सुरुवातील उडवा-उडवीचे उत्तरे देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळानंतर त्याने माहिती दिली. दुर्मीळ वन्यप्राणी खवल्या मांजराचा गुप्तधन शोधण्याकरीता तसेच तिलस्मी औषधीकरीता वापर होत असून, लोकांमध्ये अंधविश्वास असल्याने त्या खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार मोठी किंमत मिळते.

इरफानने त्याचा साथीदार शकील बाबू सैफी रा. सलाई ता. जि. हापूर (उत्तरप्रदेश). सध्या तो गडचिरोलीतील इंदिरानगर येेेथे ढोके यांच्या घरी किरायाने राहतो. याचेसह मिळून खवल्यामांजर विक्री करण्याकरिता दाेन दिवसापुर्वी राजु आंदुलान घोती याच्या घरी आणले व खवल्या मांजर हे जनसामान्याचे दृष्टीस पडू नये, याकरीता गावापासून दूर अंतरावर असलेल्या शेतामध्ये ठेवून त्याची विक्री करण्याचा बेत ठरवून साथीदार शकीला बाबू सेफी आणी राजू आंदुलाल घोती, असे दोघे शतात लपूून बसले आहेत. अशी माहिती मिळाली. कुदरसी टोला येथे रात्रीच्या सुमारास घेराव बंदी करुन त्यांना खवल्यामांजरासह ताब्यात घेण्यात आले. इसमांच्या ताब्यातुन खवल्यामांजराची सुटका करून संबधीता विरुद्ध कायदेशिर कारवाई करीता वन विभागाचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक उल्हास पी. भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे तसेच पथकाने केली.