आष्टीत हजारो अनुयायांनी केले बाबासाहेबांना अभिवादन
By Admin | Updated: April 15, 2016 01:53 IST2016-04-15T01:53:54+5:302016-04-15T01:53:54+5:30
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ...

आष्टीत हजारो अनुयायांनी केले बाबासाहेबांना अभिवादन
आष्टी : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आष्टी येथील डॉ. आंबेडकर चौकात बुधवारी रात्री ९ वाजता भीमगीतांवर नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून हजारो अनुयायी व नागरिकांनी त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी सरपंच वर्षा देशमुख, जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, सुंदरदास उंदीरवाडे, मार्र्कं डाच्या सरपंच अनिता अवसरमोल, आष्टीच्या उपसरपंच नंदा डोर्लीकर, पोलीस पाटील प्रमोद खांडरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सिंगटे, ग्रा. पं. सदस्य रवी नागुलवार, आनंद कांबळे, विभा देठे, माया ठाकूर, ग्राम विस्तार अधिकारी बी. डी. चौधरी, बिट अमलदार संघरक्षित फुलझेले आदींनी पुष्पचक्र वाहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरबत व पेय जलाचे वाटप करण्यात आले. याचा लाभ अनेकांनी घेतला.