कुरूड येथे हजारावर लाेकांची काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:15+5:302021-05-03T04:31:15+5:30
कुरूडच्या सरपंच प्रशाला गेडाम यांनी काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शेडमाके व आराेग्य ...

कुरूड येथे हजारावर लाेकांची काेराेना चाचणी
कुरूडच्या सरपंच प्रशाला गेडाम यांनी काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शेडमाके व आराेग्य कर्मचारी नागरिकांची काेराेना चाचणी करीत आहेत. सुरुवातीला लोक कोरोना चाचणी करण्यास घाबरत होते. परंतु त्यांची भीती घालवण्यात ग्रामपंचायत प्रशासन यशस्वी झाले. पुढील ८ ते १० दिवस कोरोना शिबिर घेण्याचा सरपंच प्रशाला गेडाम यांचा मानस आहे. कुरूड येथे आतापर्यंत जवळपास एक हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून, जवळपास ५० लोक गृहविलगीकरणात आहेत. ग्रामपंचायतने नवीन कोरोना रुग्णांची व्यवस्था प्राथमिक कन्या शाळेत केलेली आहे. तेथे २४ तास पाणीपुरवठा, पंखे, शौचालय, बाथरूम या सर्व सुविधा आहेत. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी दत्तात्रय निमजे, भास्कर गेडाम, सुनीता उके, नीता फुलबांधे, नारायण अंबादे, वासुदेव लोनबलेख, गजानन चिकटवार, सुरेखा केळझरकर व आशा वर्कर यांचे सहकार्य लाभत आहे.