पाणी पुरवठ्याची २६४ कामे होणार

By Admin | Updated: February 4, 2015 23:13 IST2015-02-04T23:13:17+5:302015-02-04T23:13:17+5:30

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात नळ योजना

There will be 264 water supply works | पाणी पुरवठ्याची २६४ कामे होणार

पाणी पुरवठ्याची २६४ कामे होणार

दोन वर्षाचा कृती आराखडा तयार
दिलीप दहेलकर - गडचिरोली
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात नळ योजना व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची जिल्हाभरात २६४ कामे घेण्यात आली आहे. या कामाचा प्रस्ताव आराखड्यासह राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळताच तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतर पाणीपुरवठ्याची सदर कामे होणार आहेत.
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जातात. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने दोन वर्षाचा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा कृती आराखडा तयार केला जातो. यानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने बाराही तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये जुने व नवीन मिळून एकूण २६४ कामे घेण्यात आली आहे. कृती आराखड्यानुसार अहेरी तालुक्यात ३२ कामे घेण्यात आली असून यामध्ये २१ नळ पाणीपुरवठा योजना, आलापल्ली व नागेपल्ली येथे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे नऊ कामे घेण्यात आली आहेत.
आरमोरी तालुक्यात २० कामाचे नियोजन करण्यात आले असून यात १६ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व चार पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचा समावेश आहे. भामरागड तालुक्यात १२ कामांचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये दोन नळ पाणीपुरवठा योजना व १० विहिरींचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ५७ कामांचे नियोजन करण्यात आले असून यात २२ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व तीन विहिरी व ३२ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यात स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेची आठ कामे प्रस्तावित आहेत. धानोरा तालुक्यात ४१ कामे घेण्यात आले असून यामध्ये ३१ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व १० विहिरींच्या कामांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यात सहा स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व सहा विहिरींचा समावेश आहे. गडचिरोली तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या ३० कामांचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये २५ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व पाच विहिरींच्या कामांचा समावेश आहे. कोरची तालुक्यात पाच स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व आठ विहिरींचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यात २१ कामांचे नियोजन असून यामध्ये १४ नळ पाणीपुरवठा योजना व सात विहिरींचा समावेश आहे.
मुलचेरा तालुक्यात नळ पाणीपुरवठा योजना पाच व चार विहिरी अशा एकूण नऊ कामांचे नियोजन आहे. सिरोंचा तालुक्यात स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेची नऊ कामांचे नियोजन आहे. तयार करण्यात आलेल्या दोन वर्षाच्या कृती आराखड्यात जुन्या व नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा समावेश आहे. मात्र या आराखड्यात नव्या कामांची संख्या अधिक आहे.
दोन वर्षात होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या २६४ कामांची अंदाजपत्रकीय किंमत १२६१३.३७ लक्ष रूपये आहे. पिण्याच्या पाण्याच्या एका विहिरीचा खर्च जवळपास आठ लाख रूपये तर स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ७० ते ८० लाख रूपयांचा खर्च येतो.

Web Title: There will be 264 water supply works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.