कसारीत दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: April 15, 2016 01:55 IST2016-04-15T01:55:47+5:302016-04-15T01:55:47+5:30

लोकभिमुख अनेक योजना राबवून शासनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कसारी गावात ग्रामपंचायत मालकीच्या रस्त्यावर नांगरणी का करता,

There are two groups in Kasari | कसारीत दोन गटात हाणामारी

कसारीत दोन गटात हाणामारी

रस्त्यावरून वाद : दोन्ही बाजुच्या १२ लोकांवर गुन्हे दाखल
देसाईगंज : लोकभिमुख अनेक योजना राबवून शासनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कसारी गावात ग्रामपंचायत मालकीच्या रस्त्यावर नांगरणी का करता, अशी विचारणा केली असता, उफाळलेल्या वादावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही गटाने एकमेकाच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी १२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यावर ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असताना कसारी येथील अंगणवाडी सेविका सविता खुशाल बुद्धे (२२) हिने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यावर ट्रॅक्टरने नांगरणी कशाला करता, अशी विचारणा केली असता, यातील राजेंद्र तुकाराम पर्वते, तुकाराम पर्वते व अनिल तुकाराम पर्वते या तीन बापलेकांनी सदर महिलेचे कपडे फाडून ट्रॅक्टरखाली आणून चिरडण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार देसाईगंज पोलीस ठाण्यात सविता बुद्धे यांनी दाखल केली. सदर महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता, तिला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याचे स्पष्ट झाल्याने देसाईगंज पोलिसांनी वरील तीन बापलेक आरोपींच्या विरोधात भादंविचे कलम ३५४, ३३४, ५०४ कलमान्वये गुुन्हे दाखल केले आहे.
याप्रकरणातील तीन बापलेकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आम्हाला काठीने मारहाण करून आमचे डोके फोडले, दरम्यान उपचार करण्यासाठी घराच्या बाहेर निघालो असता, आम्हाला अडवून जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली, असे या तक्रारीत म्हटले आहे. पर्वते कुटुंबीयाच्या या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी खुशाल कवडो बुद्धे, जगींद्र बळीराम बुद्धे, सदाशिव बुद्धे, विजय बुद्धे, प्रेमचंद बुद्धे, राहुल बुद्धे, किरण बुद्धे, विमल बुद्धे, इंदिरा बुद्धे सर्व रा. कसारी यांच्या विरूद्ध भादंविचे कलम ३२६, ३४२, १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हे दाखल करून चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मानकर करीत आहेत.

Web Title: There are two groups in Kasari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.