रेमडेसिविरचे साइड इफेक्ट सध्या नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:39 IST2021-05-11T04:39:16+5:302021-05-11T04:39:16+5:30
गडचिराेली : काेराेनानंतर अनेकांना दुष्परिणाम जाणवत आहे. त्यामुळे सल्ला घेऊनच पुढील उपचार घ्या, याेगा-प्राणायाम नियमित करण्यासह सकस आहार घ्या, ...

रेमडेसिविरचे साइड इफेक्ट सध्या नाही
गडचिराेली : काेराेनानंतर अनेकांना दुष्परिणाम जाणवत आहे. त्यामुळे सल्ला घेऊनच पुढील उपचार घ्या, याेगा-प्राणायाम नियमित करण्यासह सकस आहार घ्या, असा सल्ला जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे. काेराेनाबाधितांवर रेमडेसिविर इजेक्शन व स्टेरॉइड माध्यमातून औषधाेपचार सुरू आहे. रेमडेसिविर घेणाऱ्या रुग्णांवर सध्यातरी काेणतेही साइड इफेक्ट झाले नसल्याची माहिती आराेग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
गडचिराेली जिल्ह्यात सध्या काेराेनाबाधितांवर काेविड रुग्णालय व काेविड केअर सेंटरमध्ये माेठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत. काेराेनाबाधितांना सकाळी व सायंकाळी अशा दाेन्ही वेळेला गाेळ्यांचा माेठा डाेसही दिला जात आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, आवश्यक त्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन लावले जात आहे. गडचिराेलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या दीड ते दाेन महिन्यात बऱ्याच बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन लावण्यात आल्याची माहिती एका डाॅक्टरांनी दिली आहे.
काेराेना आजारातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनंतर अनेक रुग्णांना साइड इफेक्ट्स जाणवू लागतील. अशक्तपणा, मानसिक आराेग्य बिघडणे, गंध आणि चव हरविणे, एकाग्रता जाणे यासारखे परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काेराेना विषाणू हा शरीरातील राेगप्रतिकारकशक्तीवर परिणाम करताे. शरीराला काेणत्याही आजाराला लढायचे असेल तर आपली राेगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. काेराेना राेगप्रतिकारक शक्तीला खिळखिळी करून टाकताे. त्यामुळे काेराेना विषाणू नष्ट झाले तरी राेगप्रतिकार वाढायला वेळ लागताे.
बाॅक्स...
तक्रारी नाही
रेमडेसिविर इंजेक्शन घेतल्यानंतर रायगड जिल्ह्यात रुग्णांना दुष्परिणाम जाणवू लागले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने त्या जिल्ह्यात या इंजेक्शनच्या वापरावर बंदी घातली. गडचिराेली जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर साइड इफेक्ट झाले नाही. साइड इफेक्ट झाल्याबाबतच्या आराेग्य प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या नाही, अशी माहिती मिळाली आहे.
बाॅक्स...
किरकाेळ इफेक्ट्स
काेराेना संक्रमणातून जे लाेक पूर्णत: बरे झाले त्यांच्यात आता इतर आजारांचे सामान्य दुष्परिणाम दिसून येत आहे. काेराेनातून पूर्णत: बरे झाल्यानंतर काही जणांना ताप येत आहे. काहींना थकवा जाणवत आहे तर काही रुग्णांना ल्युज माेशनची समस्या जाणवत आहे. एकूणच काेराेनाबाधितांवरील उपचार जिकिरीचा असल्याचे दिसून येते.
काेट....
काेविड रुग्णालय व काेविड सेंटरमध्ये आवश्यकतेनुसार बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन लावले जात आहे. सध्या तरी या इंजेक्शनचे काेणतेही दुष्परिणाम जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांमध्येे दिसून आले नाही.
- डाॅ. शशिकांत शंभरकर, जिल्हा आराेग्य अधिकारी, गडचिराेली
काेट....
रेेमडेसिविर इंजेक्शनचा वापर काेराेनाबाधितांवर केला जात आहे. सध्या या इंजेक्शनचे दुष्परिणाम दिसून आले नाही. मात्र काही दिवसानंतर संबंधित रुग्णांमध्ये दुष्परिणाम दिसतील. विशेष म्हणजे किडनी, लिव्हर, हार्ट आदींवर परिणाम दिसणार आहे.
- तज्ज्ञ डाॅक्टर