बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवक गेला आयसीयूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST2022-02-07T05:00:00+5:302022-02-07T05:00:37+5:30

सर्व आनंदी आनंद असताना राहुलवर अपघाताचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १ फेब्रुवारी राेजी  सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत जाताना पेपर मिलच्या पुढे जकात नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला एक सायकल उभी हाेती. सायकलला दुचाकीची धडक बसली. यात राहुलच्या डाेक्याला मार लागल्याने त्याला ब्रम्हपुरी मधील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ताे अजूनही बेशुद्धावस्थेत आहे.

The youth went to ICU before climbing Bohalya | बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवक गेला आयसीयूत

बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवक गेला आयसीयूत

पुरुषोत्तम भागडकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
 देसाईगंज : ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी’ या गाण्याप्रमाणे एक घटना देसाईगंज तालुक्यातील कुरूड गावातील युवकाबाबत घडली. त्याचे ६ फेब्रुवारी राेजी लग्न हाेणार हाेते. मात्र, १ फेेब्रुवारी राेजी त्याचा अपघात झाला. ताे बेशुद्ध असून, आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहे.
देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील राहुल देवा दिघोरे (वय २८) असे युवकाचे नाव आहे. राहुल हा देसाईगंज येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये  मागील १४ वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील एका मुलीशी जुळले, साखरपुडापण आटोपला. सर्व आनंदी आनंद असताना राहुलवर अपघाताचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १ फेब्रुवारी राेजी  सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत जाताना पेपर मिलच्या पुढे जकात नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला एक सायकल उभी हाेती. सायकलला दुचाकीची धडक बसली. यात राहुलच्या डाेक्याला मार लागल्याने त्याला ब्रम्हपुरी मधील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ताे अजूनही बेशुद्धावस्थेत आहे. विशेष म्हणजे त्याच्या दुचाकीवर असलेला बालक व दुसऱ्या एका व्यक्तीला खरचटले सुद्धा नाही. 
दिनांक ६ ला तो लग्नाच्या बेडीत अडकून आपल्या भावी जीवनाची प्रत्यक्ष सुरुवात करणार होता. पण कदाचित नियतीला हे मान्य नसावे. त्याच्याबाबत भातकुलीच्या खेळाप्रमाणे घडलेले  असून, त्याच्या संसाराचा खेळ  अर्ध्यावरच मोडला, असे म्हणावयास हरकत नाही. 

गावकरी गाेळा करीत आहेत मदत
राहुलची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.  शस्त्रक्रियेसाठी लाखाे रुपये खर्च येणार आहे. गावातील नागरिक पैसे गाेळा करीत आहेत. त्याची प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.

 

Web Title: The youth went to ICU before climbing Bohalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात