वाघाने पंजा मारला, मग गुरगुरला, आरडाओरड होताच माघारी फिरला

By संजय तिपाले | Updated: January 14, 2025 15:03 IST2025-01-14T15:02:41+5:302025-01-14T15:03:22+5:30

शेतकरी जखमी : देसाईगंजातील वैनगंगा नदीकाठी थरार

The tiger clawed, then growled, roared and turned back. | वाघाने पंजा मारला, मग गुरगुरला, आरडाओरड होताच माघारी फिरला

The tiger clawed, then growled, roared and turned back.

गडचिरोली: धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी शेतीमशागत करत असताना अचानक वाघाने हल्ला चढविला. मात्र, शेतकरी जोराने ओरडल्यावर वाघ दोन पावले मागे गेला. पुन्हा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतानाच इतर शेतकरी आरडाओरड करत धावले, त्यानंतर वाघाने माघार घेत तेथून पळ काढला. हा थरारक प्रसंग १४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता देसाईगंजातील वैनगंगा नदीकाठच्या शेतात घडला.

गणपत नखाते (४८,रा. जुनी वडसा ) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या रबी धान लागवडीचे काम सुरु आहे. त्यासाठी त्यांनी शेतात पऱ्हे टाकले होते. लागवडीसाठी शेतीची मशागत करण्यासाठी गणपत नखाते हे १४ रोजी सकाळी शेतात गेले होते. वैनगंगा नदीच्या काठावर त्यांचे शेत आहे. इतर शेतकरीही आपापल्या कामात होते. दरम्यान, पट्टेदार वाघाने गणपत नखाते आपल्या कामात व्यग्र असताना वाघाने हल्ला केला. यात त्यांच्या पायाच्या मांडीला वाघनखे ओरखडले. त्यामुळे ते जखमी झाले. मात्र, वाघाने हल्ला केल्यावर ते जोराने ओरडले, त्यामुळे   नजीकच माजी नगरसेवक सचिन खरकाटे व इतर शेतकरी काम करत होते. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेत  वाघाला पिटाळून लावण्यासाठी आरडाओरड केली. यादरम्यान सचिन खरकाटे हे देखील घसरुन पडले. त्यामुळे कंबरेला इजा झाली. वाघ गुरगरला, पण नंतर त्याने तेथून काढता पाय घेतला.  जखमी स्थितीत गणपत नखाते व  सचिन खरकाटे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आमदार रामदास मसराम यांनी  रूग्णालयात धाव घेत जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली. यासंदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी विजय धांडे यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.

दोन तास उलटूनही वनाधिकारी आलेच नाही
या घटनेनंतर परिसरात वाऱ्यासारखी बातमी पसरली. वाघ दाट झुडपात शिरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. यावेळी आरडाओरड व गोंधळ सुरु होता. वनविभागाला कळविल्यानंतर दोन तास कोणीही घटनास्थळी फिरकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

Web Title: The tiger clawed, then growled, roared and turned back.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.