आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात; घरभाडे भत्ता पूर्ववत लागू करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:09 IST2025-01-30T15:09:04+5:302025-01-30T15:09:59+5:30

Gadchiroli : १५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी करण्यात आली

The problems of ashram school employees should be resolved; house rent allowance should be reinstated | आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात; घरभाडे भत्ता पूर्ववत लागू करावा

The problems of ashram school employees should be resolved; house rent allowance should be reinstated

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी व जिल्हाध्यक्ष राधेश्याम पत्रे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात मंगळवार, २८ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांची भेट घेतली.


आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर प्रकल्प स्तरावरच्या समस्या सोडवण्याचे व वरिष्ठ कार्यालय स्तरावरच्या समस्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन सहायक प्रकल्प अधिकारी धनराज डबले यांनी दिले.


भेटीच्या वेळी कार्यालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक वासुदेव उसेंडी, कार्तिक कोवे, गुलाब बांबोळे, विशाल नन्नावरे उपस्थित होते, तर शिष्टमंडळात संघटनेचे गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड, भामरागड प्रकल्पाच्या अध्यक्ष सुरेखा तेलतुंबडे, सचिव डी. एस. घुटके, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, सहसचिव विकास जनबंधू, नागपूर प्रकल्प महिला आघाडी प्रमुख लक्ष्मी भेलवा, कोषाध्यक्ष आनंद शंखदरबार, सदस्य पुरुषोत्तम डोंगरवार, सुभाष लांडे यांच्यासह संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 


रजा कालावधीत अधीक्षक नियुक्त करण्याची मागणी
अधीक्षकांच्या रजा कालावधीत त्यांचा प्रभार अधीक्षिकांकडे सोपविणे, २०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी सहायक अधीक्षक अथवा अधीक्षिका नियुक्त करावे.


सात दिवसांच्या नैमित्तिक रजा मंजूर कराव्यात
शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची अनुक्रमे ४८०० व ४३०० ग्रेड पे नुसार एकस्तर वेतन निश्चिती करणे तसेच सात दिवसांच्या नैमित्तिक रजा द्याव्या.


घरभाडे भत्ता पूर्ववत लागू करावा
सोनसरी शाळेतील कर्मचाऱ्यांचा रोखलेला वाहनभत्ता पूर्ववत सुरू करणे, अजूनही कामावर न घेतलेल्या मागील वर्षी कार्यरत रोजंदारी वर्ग ४ कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेणे, थकबाकी रक्कम काढण्यासाठी वेतन अनुदान उपलब्ध करून द्यावे.

कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करणे, अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचान्यांना अतिरिक्त घरभाडे भत्ता पूर्ववत लागू करणे, शासकीय निवासस्थान राहण्यायोग्य नसल्याने रांगी येथील शासकीय आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ते अदा करावेत, अशी मागणी केली. याशिवाय विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: The problems of ashram school employees should be resolved; house rent allowance should be reinstated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.