आव्वाज फक्त पोलिसांचाच, वाहनांवर नका लावू भोंगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 16:38 IST2024-10-18T16:25:11+5:302024-10-18T16:38:23+5:30
Gadchiroli : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक

The noise should only be made by the police vehicles
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी ६ पूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनिक्षेपकासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित परवानगीची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक राहील.
रहदारीस अडथळा नको
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा ठिकाणी निवडणुकीसंबंधी पोस्टर, बॅनर्स, पॉम्पलेटस, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे वा निवडणुकीचे साहित्य लावण्यास मनाई राहील.
झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भित इत्यादींचा संबंधित जागामालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध राहील.