शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादाचा शेवट जवळ! 'लास्ट फायटर' पापा राव आज शरणागती पत्करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:02 IST

बस्तरला नक्षलमुक्त घोषित करण्याच्या डेडलाईनच्या अवघ्या एक आठवडा आधी, नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा आणि शेवटचा 'फायटर' समजला जाणारा कमांडर पापा राव अखेर २४ मार्च रोजी शरणागती पत्करणार आहे.

गडचिरोली:  छत्तीसगडमधील नक्षलवादाचा कणा आता पूर्णपणे मोडला आहे. बस्तरला नक्षलमुक्त घोषित करण्याच्या डेडलाईनच्या अवघ्या एक आठवडा आधी, नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा आणि शेवटचा 'फायटर' समजला जाणारा कमांडर पापा राव अखेर २४ मार्च रोजी शरणागती पत्करणार आहे. आपल्या साथीदारांसह आणि एके- ४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांसह तो पोलिसांसमोर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे बस्तरमधील नक्षली चळवळ आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.

‎५६ वर्षीय पापा राव उर्फ मंगू हा सुकमा जिल्ह्याचा रहिवासी आहे. सध्या तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य असून पश्चिम बस्तर डिव्हिजन कमिटीचा इन्चार्ज आहे. बस्तरच्या जंगल आणि जमिनीची त्याला खडानखडा माहिती असल्याने अनेकवेळा पोलिसांच्या चकमकीतून तो अगदी थोडक्यात बचावला होता. जहाल नक्षलवादी 'देवजी' याने शरणागती पत्करल्यानंतर पापा राव हा एकमेव मोठा लढाऊ कमांडर शिल्लक राहिला होता.‎​एका वर्षात संघटनेची वाताहत 

गेल्या एका वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची मोठी फळी उद्ध्वस्त केली आहे. ​खूंखार नक्षली माडवी हिडमा, सचिव बसवाराजू आणि गणेश उइके यांच्यासह १७ बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला. ​भूपती, रुपेश आणि रामधेर यांसारख्या नेत्यांनी शेकडो साथीदारांसह शस्त्रे खाली ठेवली आहेत.‎​नक्षलवाद्यांचा एमएमसी झोन ( मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड) आता पूर्णपणे साफ झाला असून, उत्तर बस्तर आणि माड विभागातूनही नक्षल्यांचे अस्तित्व संपले आहे.‎​आता फक्त 'हे' दोनच उरले...

पापा रावच्या शरणागतीनंतर आता नक्षलवादी संघटनेत फक्त दोनच मोठे चेहरे उरले आहेत, ज्यांच्या अटकेनंतर नक्षलविरोधी ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी मानले जाईल. मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती: याच्यावर ३.५ कोटींचे इनाम आहे. हा नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मानला जातो. २००३ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा हाच सूत्रधार होता. मिशिर बेसरा उर्फ भास्कर: १.३० कोटींचे इनाम असलेला बेसरा हा 'अँब्युश' (सापळा) लावण्यात माहीर मानला जातो.‎​बस्तर होणार नक्षलमुक्त?

एकेकाळी हजारो सशस्त्र कॅडर असलेल्या नक्षलवादी संघटनेकडे आता केवळ २०० ते ३०० सक्रिय सदस्य उरले आहेत. तेही आता छोट्या तुकड्यांमध्ये इकडे-तिकडे लपून बसले आहेत. पापा रावच्या शरणागतीमुळे पश्चिम बस्तरची कमिटी आता पूर्णपणे विखुरली जाणार असून, बस्तरमध्ये शांततेचा नवा सूर्योदय होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Naxalism's end near: Top commander Papa Rao to surrender.

Web Summary : Key Naxal commander Papa Rao will surrender with weapons, signaling Naxalism's decline in Bastar. Security forces have decimated Naxal leadership, leaving only two major figures. Bastar anticipates peace.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी