लग्नाच्या काही तासांपूर्वीच वधू झाली पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST2022-02-20T05:00:00+5:302022-02-20T05:00:34+5:30
दाेन्हीकडच्या मंडळींनी लग्नाच्या अगाेदर कपडे व इतर आवश्यक सामानाची खरेदीसुद्धा केली हाेती. लग्नासाठी शेजारच्या महिला पाेळ्या बनवित हाेत्या. आचारी स्वयंपाक बनवत हाेता तर इतर मंडळी लग्नमंडप तयार करण्यात व्यस्त हाेते. लग्नापूर्वी अंघाेळ करण्यासाठी वधूच्या आईने वधूला बाेलविले. मात्र वधू दिसून आली नाही. आईवडिलांनी तिच्या कपाटाची तपासणी केली असता, शाळेची कागदपत्रे, रक्कम, साेन्याचे काही दागिने दिसून आले नाही.

लग्नाच्या काही तासांपूर्वीच वधू झाली पसार
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमाेरी : लग्न समारंभासाठी मुलाकडून वरात आली हाेती. वधूकडील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना अगदी लग्नाच्या काही तासांपूर्वी वधू पसार झाल्याची घटना आरमाेरी येथे १८ फेब्रुवारी राेजी घडली. त्यामुळे वराकडील मंडळीला आल्यापावलीच परत जावे लागले.
आरमाेरी येथील या मुलीचा विवाह एक वर्षापूर्वी आरमाेरी तालुक्यातील माेहझरी या गावातील युवकाशी जुळला हाेता. १८ फेब्रुवारी ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली हाेती. दाेन्हीकडच्या मंडळींनी लग्नाच्या अगाेदर कपडे व इतर आवश्यक सामानाची खरेदीसुद्धा केली हाेती. लग्नासाठी शेजारच्या महिला पाेळ्या बनवित हाेत्या. आचारी स्वयंपाक बनवत हाेता तर इतर मंडळी लग्नमंडप तयार करण्यात व्यस्त हाेते. लग्नापूर्वी अंघाेळ करण्यासाठी वधूच्या आईने वधूला बाेलविले. मात्र वधू दिसून आली नाही. आईवडिलांनी तिच्या कपाटाची तपासणी केली असता, शाळेची कागदपत्रे, रक्कम, साेन्याचे काही दागिने दिसून आले नाही. हे सर्व बघून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. काही वेळातच ही बातमी आरमाेरी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.
लग्नाची तयारी अर्ध्यातच माेडून मुलीचा शाेधाशाेध घेण्यास वधूकडील मंडळी कामाला लागले. तर वराकडील मंडळी अतिशय अस्वस्थ असल्याचे दिसून येत हाेते. लग्नासाठी हजाराे रुपयांचा खर्च मुलाला करावा लागला. हा खर्च पाण्यात गेला.
पाेलिसात तक्रार
वधूच्या वडिलाने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आरमाेरी पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. वधू तिच्या प्रियकरासह लग्नाच्या दिवशीच पळून गेल्याची चर्चा आरमाेरी येथे पसरली आहे.