खड्डा चुकविताना दुचाकी घसरली; युवक जागीच ठार
By गेापाल लाजुरकर | Updated: October 18, 2023 21:04 IST2023-10-18T21:04:50+5:302023-10-18T21:04:57+5:30
दुचाकीस्वार खाली डाेक्यावर पडून जागीच ठार

खड्डा चुकविताना दुचाकी घसरली; युवक जागीच ठार
गाेपाल लाजूरकर, गडचिराेली: कुरखेडा-कढोली मार्गावर घाटीजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविताना दुचाकी अनियंत्रित झाली. यात दुचाकीस्वार खाली डाेक्यावर पडून जागीच ठार झाला. ही घटना मंगळवार १७ ऑक्टाेबर राेजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
नेताजी बालाजी गेडाम (३७) रा. काेरेगाव ता. आरमाेरी असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. नेताजी गेडाम यांची पत्नी कोरची येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. ते दाेघेही श्रीराम नगर करखेडा येथे राहत होते. मंगळवारी ते आपल्या दुचाकीने काेरेगाव येथून कुरखेडाकडे येत असताना घाटी गावाजवळ मुख्य रस्त्यावर असलेला खड्डा चुकविताना दुचाकी अनियंत्रित झाली. यात त्यांच्या डाेक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना वेळीच कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.