पाेलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीशी ठाणेदाराचा असभ्य व्यवहार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:37 IST2021-03-26T04:37:09+5:302021-03-26T04:37:09+5:30
आष्टी ठाण्यातील पाेलीस कर्मचारी व त्याची पत्नी यांच्यामध्ये घरगुती भांडण झाले हाेते. यादरम्यान पाेलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची समजूत काढण्याच्या उद्देशाने ...

पाेलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीशी ठाणेदाराचा असभ्य व्यवहार?
आष्टी ठाण्यातील पाेलीस कर्मचारी व त्याची पत्नी यांच्यामध्ये घरगुती भांडण झाले हाेते. यादरम्यान पाेलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची समजूत काढण्याच्या उद्देशाने २२ मार्च राेजी प्रभारी ठाणेदार बिराजदार हे आपल्या दाेन कर्मचाऱ्यांसाेबत पाेलीस कर्मचाऱ्याच्या घरी गेले. काही वेळाने दाेन्ही पाेलीस कर्मचारी व महिलेच्या पतीला त्यांनी एकांतात समजावण्यासाठी घराबाहेर पाठवले. पण यावेळी तिच्यासाेबत असभ्य व्यवहार केल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. याबाबत आष्टी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी ती गेली मात्र तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे थेट जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आपबिती सांगितली आहे. संंबंधित ठाणेदारावर कारवाई करावी, अशी मागणी त्या महिलेने पत्रकार परिषदेतूनही केली आहे.
काेट.......
जिल्हा पाेलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चाैकशी माझ्याकडे साेपविली आहे. पाच दिवसांत चाैकशीचा अहवाल जिल्हा पाेलीस अधीक्षकांकडे सादर करायचा आहे. त्यानंतर पाेलीस अधीक्षक याेग्य ताे निर्णय घेतील. ही चौकशी पारदर्शकपणे केली जात आहे.
- प्रणील गिलदा, उपविभागीय पाेलीस अधिकारी, गडचिराेली