पाठ्यपुस्तके वाहतुकीत गैरव्यवहार
By Admin | Updated: May 23, 2015 02:04 IST2015-05-23T02:04:36+5:302015-05-23T02:04:36+5:30
सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिका मोफत वितरित केले जाते.

पाठ्यपुस्तके वाहतुकीत गैरव्यवहार
अहेरी : सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिका मोफत वितरित केले जाते. शासन निर्णयाप्रमाणे पाठ्यपुस्तके वितरणाचा प्रतिटन १२०० रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र एटापल्ली, अहेरी तालुक्यातील नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती, नक्षलवाद व वाहतूक सुविधेचा अभाव असल्याच्या कारणावरून पाठ्यपुस्तक वाहतुकीचे बोगस अतिरिक्त देयके काढली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाठ्यपुस्तके वाहतुकीत गैरव्यवहार होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पाठ्यपुस्तके वाहतुकीत अनेक अडचणींचा बाऊ करून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांची दिशाभूल करून २० हजार रूपयांचे देयके एक लाख रूपयांच्या घरामध्ये काढल्या जात आहे. पाठ्यपुस्तकावर शिक्का मारण्यासाठी शिक्का उपलब्ध करून दिल्या जात नाही. मात्र शिक्क्याचे देयक जवळपास १० ते १५ हजार रूपये काढल्या जात आहे. या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच वाहतूकदारांची प्रत्यक्षरीत्या चौकशी करून या गैरप्रकारावर आळा घालावा, अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.
सदर घोटाळ्याला आळा न घातल्यास शिक्षक संघटनांमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.