तेंदूपत्याला अपेक्षित भाव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:50+5:302021-03-24T04:34:50+5:30
एटापल्ली तालुक्यात एकूण १९८ गावे आहेत. या सर्वच गावांमध्ये कमीजास्त प्रमाणात तेंदूपत्त्याचे उत्पादन हाेते. मागील वर्षीपर्यंत प्रत्येक ग्रामसभा स्वतंत्र ...

तेंदूपत्याला अपेक्षित भाव मिळेना
एटापल्ली तालुक्यात एकूण १९८ गावे आहेत. या सर्वच गावांमध्ये कमीजास्त प्रमाणात तेंदूपत्त्याचे उत्पादन हाेते. मागील वर्षीपर्यंत प्रत्येक ग्रामसभा स्वतंत्र तेंदूपत्त्याचा लिलाव आयाेजित करून विक्री करीत हाेती. यामध्ये प्रत्येक ग्रामसभेला वेगवेगळा भाव मिळत हाेता. व्यापाऱ्यांकडून शक्यताे कमी भाव देण्याचा प्रयत्न राहत हाेता. यावर्षी सर्व गावे चार पट्टी (युनिट) मध्ये विभागण्यात आली आहेत. ताेडसा, गट्टा, वेनासर, जारावंडी या चार पट्टींचा समावेश आहे. प्रत्येक पट्टीमध्ये ४० ते ५० गावे आहेत. सर्व पट्टींमधील तेंदूपत्याचे दर किमान १५ हजार रूपये प्रति गाेणी ठरविण्यात आले आहेत. मात्र तेवढ्या भावाची बाेली एकाही पट्टीला लागली नाही. गट्टा पट्टीत तिनदा लिलाव झाला. मात्र अपेक्षित भाव मिळाला नाही तर ताेडसात दाेनदा लिलाव आयाेजित करण्यात आला मात्र अपेक्षित भाव मिळाला नाही. सर्व गावांकरिता एकच भाव देणे शक्य नसल्याचे कंत्राटदारांनी बाेलून दाखविले आहे.
यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला आहे. यंदा बाजारपेठेत तेंदूपत्त्याला चांगली मागणी व भाव मिळण्याची शक्यता असल्याने ग्रामसभांनी तेंदूपत्त्याचे अपेक्षित दर वाढविले आहेत.