अतिक्रमण करणाऱ्यांना तात्पुरता दिलासा

By Admin | Updated: April 27, 2017 01:15 IST2017-04-27T01:15:23+5:302017-04-27T01:15:23+5:30

३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासंबंधी कारवाई करण्याकरिता देसाईगंज शहरातील २०० वर

Temporary Relief for the encroachers | अतिक्रमण करणाऱ्यांना तात्पुरता दिलासा

अतिक्रमण करणाऱ्यांना तात्पुरता दिलासा

देसाईगंज : आमदारांची अधिकाऱ्यांशी चर्चा
देसाईगंज : ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासंबंधी कारवाई करण्याकरिता देसाईगंज शहरातील २०० वर व्यावसायिकांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यामुळे या अतिक्रमणधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर आ. क्रिष्णा गजबे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा येथील अधिकाऱ्यांना चर्चेकरिता बोलाविले व महामार्गावरील अतिक्रमण सध्या काढू नका, त्याला तात्पुरती स्थगिती द्या, अशी सूचना केली.
देसाईगंज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी वरील अतिक्रमण काढण्यासाठी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग भंडारा यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर महामार्ग प्राधिकरणाने कुरखेडा-आरमोरी मार्गावरील शहराच्या बसस्थानकापासून तर विश्रामगृहापर्यंतच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात २४ एप्रिल रोजी नोटीस बजाविली होती. त्यामुळे २०० वर व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट येणार होते. शहराच्या बाहेरून बायपास मार्ग मंजूर असताना शहराच्या मध्यातून महामार्गाची बांधणी का करण्यात येत आहे, असा प्रश्न निर्माण झाला होता. अतिक्रमण काढण्याच्या संबंधाने महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शहरात सर्वे करण्यासाठी आले, याची माहिती आ. क्रिष्णा गजबे यांना मिळताच, त्यांनी या अधिकाऱ्यांशी एक तास चर्चा केली व या चर्चेदरम्यान मार्ग बांधकामासाठी निधी सध्या उपलब्ध नाही. केवळ तक्रारीमुळे आम्ही अतिक्रमण काढण्यासंबंधाने व्यावसायिकांना नोटीस बजाविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी या मार्गाच्या बांधकामाला निधी मंजूर होईल आणि शहरातून अतिक्रमण काढण्याची वेळ येईल, तेव्हा सर्व दुकानदार स्वत: अतिक्रमण काढतील, असे आश्वासन आमदारांनी या अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सध्या अतिक्रमणाच्या मोहिमेला स्थगिती देण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Temporary Relief for the encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.