शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन थकले

By admin | Updated: September 25, 2014 23:23 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवाव्या

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवाव्या असा मोठा प्रश्न या शिक्षकांच्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत १९ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. यामध्ये शेकडो शिक्षक म्हणून काम करीत आहेत. या शिक्षकांचे मागील जून महिन्यापासूनचे वेतन झाले नाही. एक महिन्यानंतरच शिक्षकांनी प्रकल्प कार्यालयाला याबाबत निवेदन देऊन वेतन देण्याची मागणी केली होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या शिक्षकांना वेतन देण्यात आले नाही. दुर्गम भागातील आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाने आश्रमशाळा काढल्या आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाच उपाशी राहण्याची पाळी येत असेल तर शिक्षणाचे धडे कसे काय दिले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेकडो किमी अंतरावर असलेल्या दुर्गम भागात जाऊन कुटुंबापासून दूर राहून शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र वेतनाअभावी कुटुंब आर्थिक संकटात सापडले असल्याने शिक्षकांसमोर फार मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपासून वेतनच नसल्याने शिक्षकांना कर्ज काढून कुटुंब व आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. हजारो रूपयांची उधारी झाल्याने किराणा दुकानदार किराणा देण्यासाठी तयार नाही. घरमालक घरभाड्यासाठी तगादा लावणे सुरू केले आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शिक्षकांची फार मोठी कुचंबना झाली आहे. अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होणे नित्याचीच बाब झाली आहे. शासकीय आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अगदी वेळेवर होतात. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करीत अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन दिले जात नाही. हा दुजाभाव अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी करणारा आहे. वेतन वेळेवर देण्यात यावे यासाठी आश्रमशाळा कर्मचारी व शिक्षकांनी अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मंत्रालयावर मोर्चा काढला आहे, उपोषण मोर्चा अनेकवेळा काढून या गंभीर समस्येबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यात आदिवासी विकास विभागाला यश प्राप्त झाले नाही. आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासींच्या विकासासाठी शेकडो योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. असे असतांनाही निधी नसल्याचे कारण पुढे करीत या कर्मचाऱ्यांचे वेतन कसे काय थकविले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)