काेराेना नियंत्रण माेहिमेत शिक्षकांना विमा कवच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:40 IST2021-04-28T04:40:14+5:302021-04-28T04:40:14+5:30

गडचिराेली : काेविड नियंत्रणाच्या माेहिमेत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शिक्षक ग्रामीण व शहरी भागात काम करीत आहेत. ...

Teachers do not have insurance cover in the car control campaign | काेराेना नियंत्रण माेहिमेत शिक्षकांना विमा कवच नाही

काेराेना नियंत्रण माेहिमेत शिक्षकांना विमा कवच नाही

गडचिराेली : काेविड नियंत्रणाच्या माेहिमेत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शिक्षक ग्रामीण व शहरी भागात काम करीत आहेत. काेविड सेवेत कार्यरत असताना जिल्ह्यासह राज्यात अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र माेहिमेतील शिक्षकांना विमा कवच नसल्याने अशा शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडत आहे.

जिल्ह्यातील जि.प. शाळांचे बरेच शिक्षक काेविड नियंत्रणासाठी ग्रामीण भागात काम करीत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या संशयितांची माहिती ते ठेवत आहेत. दरम्यान, हे काम करताना शिक्षकांना काेराेनाची लागण हाेत आहे. मात्र शासनाकडून विमा कवच दिले जात नसल्याने सेवा देणाऱ्या शिक्षकांचे मनाेबल खचत आहे. काेविड नियंत्रण माेहिमेचे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना ५० लाखांचा विमा कवच शासनाने लागू करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली. मात्र या विम्याचा लाभ गडचिराेली जिल्ह्यातील काेविड सेवेत मृत पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना मिळालेला नाही. पीडित शिक्षक कुटुंबांना विम्याचे क्लेम देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून हाेत आहे.

दरम्यान, शिक्षकांची काेविड सेवा घेण्यापूर्वी प्रत्येक काेविड दवाखान्यात त्यांच्यासाठी बेड राखीव ठेवावे. काेविडच्या कर्तव्यावर असलेला शिक्षक पाॅझिटिव्ह आल्यास त्यांची पुन्हा ड्यूटी लावण्यात येऊ नये, अशीही मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. यासंदर्भात शासन व प्रशासनाने ठाेस पावले उचलण्याची गरज आहे.

काेट...

काेविड अंतर्गत सर्व्हे करणाऱ्या शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या काेविड विमा कवचाला शासनाने अजूनही मुदतवाढ दिली नाही. सर्व्हे करतेवेळी मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लाेव्हल, फेस शिल्ड, पीपीई किट आदी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षकांना न्याय प्रदान करावा, अशी आमची मागणी आहे.

- राजेंद्र घुगरे, मुख्याध्यापक

काेट..

काेविड सेवेत कार्यरत असताना महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र यापैकी बऱ्याची शिक्षकांना काेविड क्लेम न मिळाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर सर्व कर्मचाऱ्यांना काेविड विम्याचा लाभ मिळाला आहे. शिक्षकांबाबतच उदासीनता का, असा प्रश्न निर्माण हाेत आहे. शासन व प्रशासनाने शिक्षकांच्या काेविड सेवेची दखल घेऊन विम्याचे संपूर्ण संरक्षण द्यावे.

- गुरुदेव नवघडे, शिक्षक

काेट....

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची काेराेना साथराेग नियंत्रण माेहिमेत ड्यूटी लावण्यात आली आहे. आलटूनपालटून या ड्यूटी लावली जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे व गडचिराेली नगर परिषदेचे मिळून जवळपास २५० वर शिक्षक ही सेवा देत आहेत. आतापर्यंत सात शिक्षकांचा काेराेना आजाराने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र हे कारण अधिकृत ठरण्यासाठी त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आले आहे. प्रमाणपत्र मिळाल्यावरच पुढील कार्यवाही हाेईल.

- हेमलता परसा,

शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. गडचिराेली

Web Title: Teachers do not have insurance cover in the car control campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.