ओव्हरटेक करण्याच्या नादात शिक्षक दाम्पत्य बालबाल बचावले, गडचिराेली शहरातील घटना
By दिगांबर जवादे | Updated: January 18, 2024 21:52 IST2024-01-18T21:52:53+5:302024-01-18T21:52:53+5:30
Gadchiroli Accident News: एकामागेएक धावत असणाऱ्या तीन ट्रकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भर रस्त्यावरच उलटली. मात्र कारमध्ये बसलेले पतीपत्नी दाेघेही बालबाल बचावले.

ओव्हरटेक करण्याच्या नादात शिक्षक दाम्पत्य बालबाल बचावले, गडचिराेली शहरातील घटना
- दिगांबर जवादे
गडचिराेली - एकामागेएक धावत असणाऱ्या तीन ट्रकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भर रस्त्यावरच उलटली. मात्र कारमध्ये बसलेले पतीपत्नी दाेघेही बालबाल बचावले. ही घटना गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास गडचिराेली शहरात आरमाेरी मार्गावर शिवपार्वती मंदिराजवळ घडली.
युवराज श्रावण लंजे (५४) हे मुलचेरा तालुक्यातील गुंडापल्ली येथे शिक्षक आहेत. ते एमएच ३३ व्ही ७३४५ क्रमांकाच्या कारने अर्जुनी माेरगाव येथून गडचिराेली मार्गे गुंडापल्ली येथे जात हाेते. साेबत त्यांची पत्नी हाेती. आरमाेरी मार्गावर एकामागेएक तीन ट्रक इंदिरागांधी चाैकाकडे जात हाेते. दरम्यान पुरेशी जागा नसतानाही चालक युवराज लंजे यांनी या तिन्ही ट्रकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान ट्रकला धडक बसण्याची शक्यता असल्याने चालकाने कारचे एकदम ब्रेक दाबले. यात कार उलटून युवराज लंजे व त्यांच्या पत्नी कारमध्ये सापडल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने दाेघांनाही काेणतीही इजा झाली नाही, अशी माहिती गडचिराेली पाेलिसांनी दिली.