शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

एनपीएसबाबत शिक्षक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 6:00 AM

राज्य सरकारने जुनी पेंशन योजना ३१ ऑक्टोबर २००५ च्या अध्यादेशाद्वारे बंद केली. त्यानंतर १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अंशदायी पेंशन योजना लागू केली. सदर योजना अन्यायकारक असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून झाला व ही योजना योग्यरित्या राबविण्यात न आल्याने जुनी पेंशन हक्क योजना कायमची बंद केली.

ठळक मुद्देडीसीपीएस योजनेचा हिशेब मिळेना : समाविष्ट करण्याबाबत विभागाचे पत्र धडकले

रोशन थोरात ।लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : शासनाने कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी पेंशन योजना बंद करून अंशदायी पेंशन योजना लागू केली. आता परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील (डीसीपीएस) सर्व शाळांच्या शिक्षकांना केंद्र शासनाच्या नव्या एनपीएस योजनेत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे पत्रही शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना पोहोचले आहेत. मात्र नव्या एनपीएस योजनेत समाविष्ट व्हावे की नाही, अशा संभ्रमात बहुतांश शाळांचे शिक्षक सापडले आहेत.राज्य सरकारने जुनी पेंशन योजना ३१ ऑक्टोबर २००५ च्या अध्यादेशाद्वारे बंद केली. त्यानंतर १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अंशदायी पेंशन योजना लागू केली. सदर योजना अन्यायकारक असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून झाला व ही योजना योग्यरित्या राबविण्यात न आल्याने जुनी पेंशन हक्क योजना कायमची बंद केली. शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली अंशदायी पेंशन योजना कर्मचाऱ्यांच्या फायद्याची ठरली नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. कारण मयत झालेल्या कर्मचाºयांच्या वारसदारांना कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाही.दरम्यान अंशदायी पेंशन योजनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेंशन संघटन व इतर सर्व संघटनांनी आंदोलन केले. मात्र शासनाने या आंदोलनाच दखल घेतली नाही. परिणामी शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेंशन हक्क योजना लागू केली नाही. आता पुन्हा अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील शिक्षकांना केंद्र सरकारच्या एनपीएस योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीसीपीएस योजनेत शिक्षकांच्या किती रकमेची दर महिन्याला कपात झाली. मे २०१८ पासून १० टक्के रक्कम कपात करण्यात आली. मात्र याचा हिशेब शिक्षकांना अद्यापही कळला नाही. याचे कारण शिक्षकांना पावत्या मिळाल्या नाही. कपात झालेल्या पेंशन योजनेचा हिशेब नाही व नव्या योजनेत समाविष्ट कसे व्हायचे, असा सवाल शिक्षकांना पडला आहे. १९ सप्टेंबर २०१९ च्या जीआरनुसार सर्व शिक्षकांना केंद्र सरकारच्या नव्या एनपीएस योजनेत समाविष्ट करण्याचा उल्लेख आहे. याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. सुरूवातीला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एनपीएसमध्ये समाविष्ट करण्यात आले. आता शिक्षकांना समाविष्ट केल्या जात आहे.सर्व शिक्षकांचे अर्ज भरून घेण्याचे आदेशगडचिरोली जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना राज्य सरकारच्या डीसीपीएस योजनेतून केंद्र सरकारच्या एनपीएस योजनेत समाविष्ट करण्याबाबत जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाचे पत्र मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले आहे. खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे एनपीएस योजनेंतर्गत सीएसआरएफ फॉर्म भरून संबंधित मुख्याध्यापकांनी पीआरएएन नं. प्राप्त करून घ्यावा, असे आदेशित केले आहे. याची मुदत ३० नोव्हेंबर अशी आहे. शिक्षकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षक