शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:50 IST

गेल्या १० दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मात्र अनेक ठिकाणी सातव्या दिवसापासूनच विसर्जनाला सुरूवात झाली.

ठळक मुद्देकर्णकर्कश डीजेला फाटा : आज अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुका; पोलिसांचा चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मात्र अनेक ठिकाणी सातव्या दिवसापासूनच विसर्जनाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील ४६५ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी रविवारी सर्वाधिक २६८ मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.उच्च न्यायालयाने कर्णकर्कश डीजेंच्या वापरावर बंदी घातल्यानंतरही काही मंडळांनी विनापरवाना डीजे लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी समज दिली. त्यानंतर ऐकत नसलेल्यांवर कारवाई करण्यात आली. डीजे चालत नसल्याचे समजल्यानंतर अनेक मंडळांनी समजुतदारपणा दाखवत ढोलताशांना प्राधान्य दिले. याशिवाय झांजच्या गजरात भजन म्हणणाऱ्या पथकांना तसेच पारंपरिक आदिवासी नृत्य करणाºया पथकांनाही गणेश मंडळांकडून प्राधान्य दिले जात आहे.यावर्षी जिल्हाभरातील ४६५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गणेशोत्सवासाठी नोंदणी केली होती. याशिवाय २६९१ ठिकाणी खासगी गणपतींची स्थापना झाली होती. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २१९ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ची स्थापना करून एकात्मतेचे दर्शन घडविण्यात आले. काही मंडळांनी रक्तदान शिबिर, कबड्डी स्पर्धासारखे सामाजिक उपक्रमही राबविले. विशेष म्हणजे या उत्सवादरम्यान जिल्ह्यात कुठेही सामाजिक तेढ किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याचे प्रकार घडले नाही.गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. रविवारी गडचिरोली शहरातील १५ तर लगतच्या ग्रामीण भागातील ७ मंडळांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी ४ पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी तर ३५ होमगार्ड सुरक्षा बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत.संपूर्ण जिल्हाभरात रविवारी शहरी भागात ९१ तर ग्रामीण भागात १७७ मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.तीन मंडळांचे डीजे जप्तगडचिरोली शहरात शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजविणाºया तीन मंडळांचे डीजे जप्त करण्यात आले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, युवा गणेश मंडळ, फुटका मंदिर, अनादी शशिकांत मंडळ रामनगर आणि बाल गणेश मंडळ, त्रिमुर्ती चौक यांच्या विसर्जन मिरवणुकीत विनापरवाना डीजेवर गाणी वाजविली जात होती. क्षमतेपेक्षा जास्त आवाजात वाजविल्या जात असलेल्या या डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी एसडीपीओ विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक उदार, उपनिरीक्षक पाटील आदींनी ते डीजे जप्त करण्याची कारवाई केली. यात डीजेसह ६ मोठी वाहने, ३ जनरेटरही जप्त करण्यात आले.वीज पुरवठ्यासाठी कारवाई नाहीचजिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेतला नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतरही महावितरण कंपनीने कोणत्याही गणेश मंडळावर दंडात्मक कारवाई केली नाही. अशा मंडळांचे सर्व्हेक्षण करून त्यांना अधिकृत कनेक्शन घेण्यास सांगितले जाईल आणि न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणावरही कारवाई झाली नाही.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन