शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

संविधान विरोधकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:52 PM

दिल्ली येथील जंतर-मंतर मैैदानावर ९ आॅगस्ट रोजी भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या विरोधकांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना व समाजबांधवांच्या वतीने शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रपती व पंतप्रधानांकडे मागणी : एसडीओ व तहसीलदारांमार्फत पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिल्ली येथील जंतर-मंतर मैैदानावर ९ आॅगस्ट रोजी भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या विरोधकांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना व समाजबांधवांच्या वतीने शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.चामोर्शी - चामोर्शी येथे साधुबाबा कुटीत सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत निषेध सभेचे आयोजन १८ आॅगस्ट रोजी नगर पंचायत भवनात करून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी न.पं.उपाध्यक्ष राहुल नैताम, पी.जे.सातार, बाळू दहेलकार, अतुल येलमुले, सत्यवान वाळके, सुखराम साखरे, अटकरे, बालाजी शेडमाके, पुरूषोत्तम घ्यार, राकेश खेवले, ऋषीदेव कुनघाडकर, देवाजी तिम्मा, आर.डी.राऊत, गोकुलनदास झाडे, मानपल्लीवार, श्याम रामटेके, दुधबळे, नाकाडे, सुनील कावळे, रमेश गेडाम, सदाशिव बोकडे, आनंद सोनकुसरे, नवनाथ अतकरे, डी.बी.बोरकर व नागरिक हजर होते.देसाईगंज - जंतर मंतर व संविधानाची प्रत जाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षा भूमी देसाईगंज यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना कविता मेश्राम, ममता जांभुळकर, श्यामला राऊत, फुलझेबा डांगे, गायत्री वाहने, मंदा शिम्पोलकर, यशोदा मेश्राम, विश्रांती वाघमारे, लक्ष्मीबाई वासनिक, भूषण सहारे, राजकुमार मेश्राम, रामटेके, मारोती जांभुळकर उपस्थित होते.गडचिरोली - दिल्लीच्या जंतर मंतरवर संविधानाचा अपमान करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुका माळी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. येथील माळी समाजाच्या महिलांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते सदर मागणी करण्यात आली. याप्रसंगी महिला माळी समाजाच्या तालुकाध्यक्ष सुधा चौधरी, सचिव अल्का गुरनुले, ज्योती मोहुर्ले, चैताली चौधरी, कांता लोनबले, वंदना मोहुर्ले, ज्योती जेंगटे, उषा शेंडे, मनीषा निकोडे, संजिवनी कोटरंगे, कुसुम गुरनुले, गीता सोनुले उपस्थित होते.आरमोरी - दिल्ली येथील जंतर मंतरवर भारतीय संविधानाची प्रत जाळून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाºया लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टी विधानसभा क्षेत्र आरमोरीच्या वतीने राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली. सदर कृत्य कायद्याने गुन्हा आहे. हे माहित असतानाही समाजकंठकांनी सदर कृत्य करून व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे सदर समाजकंटकांविरूद्ध भारतीय संविधानाचा अपमान केल्याबद्दल तसेच बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हा प्रभारी प्रशांत दोनाडकर, विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ घुटके, विधानसभा महासचिव विनोद वरठे, कृपानंद सोनटक्के, सुधीर बोदेले, संजय मोडघरे, विशाल बनकर, अमरकुमार फुलझेले, प्रदीप खोब्रागडे, विनोद बांबोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार