आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: July 3, 2016 01:22 IST2016-07-03T01:22:19+5:302016-07-03T01:22:19+5:30
मुुंबई-दादर येथील डॉ. आंबेडकर भवनाची तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
आरमोरी तहसीलदारांना निवेदन : भारीप बहुजन महासंघाची मागणी
आरमोरी : मुुंबई-दादर येथील डॉ. आंबेडकर भवनाची तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारीप बहुजन महासंघ आरमोरी व भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा आरमोरी यांनी स्वतंत्र्यरित्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबई दादर येथील डॉ. आंबेडकर भवन आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान होते. २५ जूनच्या रात्री रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी आंबेडकर भवन बुलडोजरने उद्ध्वस्त केले. सदर घटनेने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांनी स्वत:च्या पैशातून या वास्तूची निर्मिती केली होती. ही वास्तू पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा भारीप बहुजन महासंघ व बौध्द महासभा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतेवेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष हंसराज बडोले, तालुकाध्यक्ष भिमराव ढवळे, व्ही. जी. शेंडे, केशव बांबोळे, रोहिदास बोदेले, धम्मानंद मेश्राम, के. डी. बांबोळे, जगदिश रामटेके, वासुदेव अंबादे, मुरलीधर नंदनवार, लता बारसागडे, इंदिरा देशपांडे, रामदास डोंगरवार आदी उपस्थित होते.
भारतीय बौध्द सभेच्या मार्फतीने निवेदन देतेवेळी धर्मा बांबोळे, गणपत शेंडे, राजकुमार देशपांडे, अरविंद बागडे, अंजली रोडगे, भूमिका बागडे, कुंदा सहारे, इंदिरा देशपांडे, माया शेंडे, संध्या रामटेके, करूणा नागदेवे यांच्यासह भारतीय बौध्द सभा आरमोरीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)