महाशिवरात्रीनिमित्त रताळ्यांनी खाल्ला भाव, दर गेले शंभरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:23 IST2025-02-24T14:22:21+5:302025-02-24T14:23:42+5:30
Gadchiroli : या भागात होते रताळ्यांचे उत्पादन

Sweet potatoes have skyrocketed in price on the occasion of Mahashivratri, prices have crossed 100.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाशिवरात्री सणानिमित्त बाजारात रताळ्यांची आवक झाली. मात्र, ही आवक फारशी नव्हती. महाशिवरात्रीच्या पर्वावर रताळे खरेदीची लगबग दिसून आली. शनिवारी शहरातील बाजारपेठेत रताळ्यांना १०० रूपये किलो दर होता. आज रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात ८० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री सुरू होती.
दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह साबूदाणा, शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती. बटाट्याचे दर स्थिर होते. प्रतिकिलो ३० रूपयांप्रमाणे बटाट्यांची विक्री आठवडी बाजारात सुरू होती. चंद्रपूर जिल्हयाच्या सिंदेवाही तालुक्यातून शहराच्या बाजारपेठेत गेल्या चार दिवसांपासून रताळ्यांची आवक होत आहे. विक्रेत्यांनी विक्रेत्यांनी परजिल्हयांतून रताळ्यांची मागणी किरकोळ विक्रीसाठी केली.
या भागात होते रताळ्यांचे उत्पादन
गडचिरोली जिल्हयात आरमोरी तालुक्यात रताळ्यांचे उत्पादन होते. कोसरी, मानापूर तसेच वैरागडच्या परिसरात शेतकरी रताळ्यांचे उत्पादन घेतात. गडचिरोलीच्या आठवडी बाजारात याच भागातून रताळ्यांची आवक झाली.
"शनिवारला ८० ते १०० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री केली. आठवडी बाजारात ७० रूपये किलो दराने रताळे विकत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर उपवासाला खाण्यासाठी रताळे अनेकजण खरेदी करीत आहेत."
- चंद्रशेखर मेश्राम, विक्रेते, गडचिरोली