स्वराज्य ध्वज मोहीम पोहोचली दुर्गम गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:40+5:302021-09-21T04:40:40+5:30
कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काॅंगेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, विवेक ब्राम्हणवाडे, योगेश नांदगाये, विवेक जकाते, प्रमिला रामटेके, इंद्रापाल सिडाम, कपिल बगडे, ...

स्वराज्य ध्वज मोहीम पोहोचली दुर्गम गावात
कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काॅंगेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, विवेक ब्राम्हणवाडे, योगेश नांदगाये, विवेक जकाते, प्रमिला रामटेके, इंद्रापाल सिडाम, कपिल बगडे, संजय शिंगाडे, प्रभाकर बारापात्रे, रेखा बारापत्रे, डॉ. अनंत कुंभारे, श्रीकांत भृगुवार उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रवासानंतर स्वराज्य ध्वज मोहीम पुढे चंद्रपूरकडे निघाली. समाजातील अनेक नामांकित व्यक्तिमत्त्वांनीही स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेतून सर्वत्र नवचैतन्य निर्माण करण्याच्या संकल्पनेचं कौतुक करून पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत बारा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीचा अनुभव घेतला आहे. स्वराज्य ध्वजाच्या प्रवासाचा प्रारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी झाला होता. ही ध्वज यात्रा एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.