लोकबिरादरीत १६० रूग्णांवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:20 IST2018-01-14T22:19:27+5:302018-01-14T22:20:36+5:30
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने १२ व १३ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शस्त्रक्रिया शिबिरात सुमारे १६० नागरिकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

लोकबिरादरीत १६० रूग्णांवर शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने १२ व १३ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शस्त्रक्रिया शिबिरात सुमारे १६० नागरिकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांमध्ये ९० नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया व ७० सामान्य शस्त्रक्रिया आहेत.
लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी अधूनमधून शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. मोफत शस्त्रक्रिया व उपचार होत असल्याने दुर्गम भागातील शेकडो रूग्ण लोकबिरादरी प्रकल्पात उपचारासाठी दाखल होतात. शुक्रवारी व शनिवारी आयोजित केलेल्या शिबिरातही शेकडो रूग्णांनी उपस्थिती दर्शविली होती. रूग्णांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे यांनी अनेक रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. त्याचबरोबर डॉ. लोकेश, डॉ. अमिरा यांनीसुद्धा शस्त्रक्रिया पार पाडल्या.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी संध्या यम्पलवार, शारदा ओक्सा, शारदा भसारकर, अरविंद मडावी, प्रियंका मोगरकर, सुरेंद्र वेलादी, शंकर गोटा, अनिल गोटा, पार्वती वड्डे, लक्ष्मी ओक्सा, गणेश हिवरकर, रमीला वाचामी, प्रियंका संगमवार, जुरी गावडे, वनिता लेकामी, सविता मडावी, प्रेमिला मडावी, जगदीश बुरडकर, प्रकाश मायकारकर, रमेश मडावी, अंजली गोटा, हेमावती मडावी यांच्यासह लोकबिरादरी प्रकल्पातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.