शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सिकलसेल किटचा पुरवठा दोन वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 05:56 IST

खर्चासाठी ५० हजारांची मर्यादा; जनजागृतीचे कंत्राट खासगी कंपनीला

गडचिरोली : विदर्भातील ११ जिल्ह्याांसह राज्यातील एकूण २१ जिल्ह्याात आढळणाऱ्या सिकलसेल या अनुवंशिक आजाराचा प्रसार रोखण्यासाठी १० वर्षांपासून सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. परंतु त्याचे निदान करण्यासाठी शासनाकडून पुरविल्या जाणाºया किटचा जवळपास दोन वर्षांपासून पुरवठाच झालेला नाही.सिकलसेल या आजाराच्या पेशी अनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत स्थानांतरित होतात. आजाराने ग्रस्त आणि आजाराचे वाहक अशा दोन प्रकारच्या पेशी असणारे लोक राज्यातआढळतात. यातील रुग्णाला अशक्तपणा येत असल्याने त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. वाहक या प्रकारातील पेशी आढळणाºया व्यक्ती स्वत: आजारी पडत नसली तरी दोन वाहक व्यक्तींमध्ये लग्न झाल्यास (पती-पत्नी) त्यांना होणारे अपत्य या आजाराने ग्रस्त आढळते. हे टाळण्यासाठी आणि आजाराचे वेळीच निदान करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सर्व नागरिकांची वेळोवेळी रक्तचाचणी केली जाते. आधी सोल्युबिलीटी चाचणी करून त्यात सिकलसेल पॉझिटिव्ह आढळळ्यास इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी करणे गरजेचे असते. परंतु दोन वर्षांपासून या दोन्ही किटचा पुरवठाच जिल्हास्तरावर झालेला नाही. मात्र, याचदरम्यान सिकलसेल चाचणी व जनजागृतीसाठी राज्यस्तरावरून एचएलएल या कंपनीला कंत्राट देण्यात आला. खासगी कंपनीच्या फायद्यासाठीच सरकारी यंत्रणेला डावलून किटचा पुरवठा बंद करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.जनजागृती सप्ताह औपचारिकताचदि.११ ते १७ डिसेंबरदरम्यान सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात सिकलसेल चाचण्यांसाठी जिल्हास्तरावर ५० हजार रुपये खर्च मर्यादेत किटची स्थानिक स्तरावर खरेदी करण्याचे पत्र आरोग्य विभागाने पाठविले. ५०० ते ८०० रुपयांची एक सेल्युबिलीटी किट तर १२ हजार ५०० रुपयांची एक इलेक्ट्रोफोरेसिस किट येते. अवघ्या ५० हजार रुपयात किती किट घ्यायच्या आणि कोणाकोणाची चाचणी करायची, असा प्रश्न जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाला पडला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य