आई व भावावर हल्ला करणाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:20 IST2019-08-14T00:19:45+5:302019-08-14T00:20:08+5:30
जमिनीच्या वादातून लहान भाऊ व आईवर कुºहाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाºया नेताजीनगर येथील इसमाने मानसिक तणावातून गावाजवळच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

आई व भावावर हल्ला करणाऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : जमिनीच्या वादातून लहान भाऊ व आईवर कुºहाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाºया नेताजीनगर येथील इसमाने मानसिक तणावातून गावाजवळच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
मनोहर गोविंद मंडल (३०) रा. नेताजीनगर असे आरोपी व आत्महत्या करणाºयाचे नाव आहे. ११ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मनोहरची आई नमिता मंडल व लहान भाऊ मनोरंजन मंडल यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान मनोहरने आईच्या दोन्ही हातावर व पोटावर कुºहाडीने वार केला. यामध्ये एक हात तुटला. तर दुसरा हात व पोटाला गंभीर जखम झाली आहे. तिला नागपूर येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. लहान भाऊ मनोरंजन हा सुध्दा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी मनोहर याने घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी मनोहरच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. आई व भावाला गंभीर जखमी केले. आता पोलीस त्याच्या मागावर असल्याने त्याच्यावर प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला होता. या तणावातूनच त्याने गावाशेजारी असलेल्या एका झाडाला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी उघडकीस आली.