विद्यार्थी करणार ५० तास काम
By Admin | Updated: December 3, 2014 22:50 IST2014-12-03T22:50:42+5:302014-12-03T22:50:42+5:30
स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता दूत म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक

विद्यार्थी करणार ५० तास काम
गडचिरोली : स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता दूत म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ५० तास काम करवून घेतले जाणार आहे. सदर अभियान गोंडवाना विद्यापीठ मुनिजन कार्यक्रम म्हणून राबविणार आहे.
मुनिजन कार्यक्रमाचा शुभारंभ गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ. दडवे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राठोड, रासेयो कार्यक्रम समन्वयक डॉ. ईश्वर मोहुर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम पडघन, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, कार्यकारी अभियंता सोनटक्के, उपअभियंता गावड, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मनोहर हेपट, काशिनाथ देवगडे, विजया गद्देवार आदी उपस्थित होते. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांना सहभागी करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत म्हणून नेमेले जाणार आहे. या अभियानांतर्गत किमान ५० तास काम करायचे असून जो महाविद्यालय वर्षभर योग्यप्रकारे उपक्रम राबविणार अशा महाविद्यालयांना जिल्हा पातळीवर कुलगुरू चषक तसेच विद्यापीठ पातळीवर मुख्यमंत्री चषक दिल्या जाईल. महाविद्यालयाचे मुख्यमापन चौकशी समितीद्वारे भेट देऊन केले जाईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले. दरम्यान सदर अभियानाविषयी चर्चा करण्यात आली व उपस्थितांकडून सूचना मागविण्यात आल्या. या चर्चेत प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, प्राचार्य डॉ. हंसा तोमर, प्राचार्य डॉ. मंडल, प्रा. डॉ. प्रदीप घोरपडे, प्रा. डॉ. संजय गोरे, काशिनाथ देवगडे, प्रा. डॉ. सुरेश खंगार, प्रा. डॉ. दुधे, प्रा. डॉ. गहाणे, प्रा. डॉ. गिरडे आदींनी सहभाग घेतला. व कार्यक्रम राबविण्यासंदर्भात सूचना केल्या. स्वच्छता उपक्रम राबविण्यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम पडघन, मुख्याधिकारी बन्नोरे, मनोहर हेपट यांनी उपक्रम राबविण्यासाठी शौचालय बांधणे, शोषखड्डे तयार करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन याविषयी शाळा, महाविद्यालय व गावकऱ्यांमध्ये जाणीव जागृती करणे आदी बाबींवर मार्गदर्शन केले. संचालन रासेयो समन्वयक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले. त्यानंतर मुनिजन कार्यक्रमाचा शुभारंभ फलकाचे अनावरण प्राचार्य डॉ. हंसा तोमर यांच्याहस्ते करण्यात आला व विद्यापीठ परिसरालगत सप्तपर्णीच्या १०० झाडांची लागवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)