यश प्राप्तीसाठी पक्ष संघटन मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 01:49 IST2016-10-27T01:49:36+5:302016-10-27T01:49:36+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ द्यावा.

यश प्राप्तीसाठी पक्ष संघटन मजबूत करा
बैैठकीत खासदारांचे आवाहन : देसाईगंज येथे कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा
देसाईगंज : केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ द्यावा. आगामी पं. स., जि. प. व न. प. निवडणुकीत यश प्राप्तीसाठी गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी देसाईगंज येथे सोमवारी आयोजित कार्यकर्ता बैठकीत केले.
देसाईगंज येथील कन्नम वॉर्डातील सिंधू भवन सभागृहात कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आ. क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष श्याम उईके, माजी भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, न. प. उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, नाना नाकाडे, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, न. प. सभापती शालू दंडवते, भाजप तालुकाध्यक्ष राजेश जेठाणी, शांता तितीरमारे, सुनीता ठेंगरी, संजय साळवे, रवींद्र बावनथडे उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला भरघोष यश मिळावे, याकरिता आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही खा. अशोक नेते यांनी केले. यावेळी किसन नागदेवे, आ. क्रिष्णा गजबे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मोतिलाल कुकरेजा तर आभार राजेश जेठाणी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी नरेश विठ्ठलानी, संतोष श्यामदासानी, कालू डेंगानी, विलास साळवे, अण्णा तुपट, मुरलीधर सुंदरकर, तेजराम हरडे, ज्योती तेलतुंबडे, मनोज खोब्रागडे, लाला रामटेके, रवी प्रधान, दीपक झरकर, श्याम ठवकर, अजय राऊत, राजू वार्जुरकर, हरिष डांगे, विशाल भुते, संजय ठाकरे, मंगेश दंडवते, नितीन बन्सोड, रवींद्र बेहरे, नाना चोपकर, सूचिंद्र दिवठे, हरी मैंद, सचिन खरकाटे व कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)