पारा चढल्याने रस्ते निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:59 IST2018-04-26T23:59:13+5:302018-04-26T23:59:13+5:30
मागील आठ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्तेही सामसूूम पडत आहेत. ग्रामीण भागात आता शेतीची कामे जवळपास संपली आहेत.

पारा चढल्याने रस्ते निर्मनुष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : मागील आठ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्तेही सामसूूम पडत आहेत. ग्रामीण भागात आता शेतीची कामे जवळपास संपली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग दुपारी सहजासहजी घराबाहेर पडत नाही. काही गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र सदर कामे सुद्धा सकाळीच आटोपली जात आहेत. भर दिवसा कडक ऊन राहत असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही. परिणामी रस्ते दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत निर्मनुष्य होत आहेत. दुपारच्या सुमारास ग्रामीण भागातील जनजीवनच विस्कळीत होत आहे. जवळपास आणखी एक महिना उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. कडक उन्हामुळे काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महिला त्रस्त आहेत.