पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:31+5:30

पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती.

Streetlight repair work underway | पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू

पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासन कामाला भिडले : पावसाने कीट खराब झाल्याने अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची शहरातील संपूर्ण १७ वार्डातील काही खांबावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर व चौकात अंधार राहत होता. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शनिवारपासून पथदिवे दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती. या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने गेल्या तीन दिवसांपासून पथदिवे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. तीन दिवसात १३ खांबावरील पथदिवे बदलविण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नगर पंचायतीच्या वतीने पथदिवे लावण्यात आले होते. मात्र पावसामुळे दिव्यामधील कीट खराब झाल्याने पथदिवे बंद पडले. अनेक दिवस नादुरूस्त स्थितीत राहिले. नगर पंचायत प्रशासनाला शहर व तालुक्यात कोणत्याच दुकानदाराकडे दिव्यांची कीट उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पथदिवे दुरूस्तीच्या कामास विललंब झाला. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिल्हा व राज्य प्रवास बंदी असल्याने पथदिवे व त्याची कीट दुसऱ्या जिल्ह्यातून आणणे शक्य झाले नाही. आता कोरोनाचा लॉकडाऊन शिथील झाल्यावर नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दुकानदारांकडून पथदिव्याची कीट बोलविण्यात आली. त्यानंतर बंद पथदिवे असलेल्या खांबावर नवीन पथदिवे लावण्याचे काम नगर पंचायतच्या वीज विभागाचे कर्मचारी रवी मडावी व त्यांचे सहकारी करीत आहेत. विद्युत खांबावर चढून दिवसभर कर्मचारी बंद पडलेले पथदिवे बदलवून त्या ठिकाणी नवीन पथदिवे लावत आहेत. या कामामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना लॉकडाऊनमुळे पथदिवे लावण्यास विलंब
४पावसाळ्यात साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात नगर पंचायतीने शहरातील सर्व पथदिवे सुरळीत ठेवणे आवश्यक होते. पथदिवे बंद पडूनही त्याची दुरूस्ती अनेक दिवस झाले नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे नवीन पथदिवे उपलब्ध न झाल्याने ते बदलविण्यास विलंब झाला.

Web Title: Streetlight repair work underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.