विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:13+5:302021-05-03T04:31:13+5:30

तिमरमचे उपसरपंच प्रफुल नागुलवार व सदस्यांनी गुड्डीगुडम परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास मदत केली. राजाराम ते गुड्डीगुडम ...

To streamline power supply, G.P. Officials helped | विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी केली मदत

विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी केली मदत

तिमरमचे उपसरपंच प्रफुल नागुलवार व सदस्यांनी गुड्डीगुडम परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास मदत केली. राजाराम ते गुड्डीगुडम परिसरात विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. जरासा वादळवारा किंवा पाऊस पडला तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. या परिसरात एकच विद्युत कर्मचारी कार्यरत असून त्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास जणूकाही तारेवरची कसरतच करावी लागते. परिसरातील विद्युत समस्या लक्षात घेता येथे पुन्हा कर्मचारी नेमने गरजेचे आहे. दाेन दिवसांपूर्वी जंगलात झाड कोसळून खांब पडल्याने खांब उचलणे व तारा सुरळीत करण्यास उपसरपंच प्रफुल नागुलवार, सदस्य श्रीकांत पेंदाम, युवक विजय आत्राम, देवाजी भुजाडी, इलियास शेख, राकेश बामनकर, शिवा कोडापे, प्रशांत बामनकर व अन्य युवकांनी सहकार्य केले. या भागातील वीज समस्या साेडविण्यासाठी कमलापूर येथे ३३ केव्ही उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: To streamline power supply, G.P. Officials helped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.