झिंगानूरला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST2021-05-15T04:35:02+5:302021-05-15T04:35:02+5:30
सिराेंचा तालुक्यातील झिंगानूर व वेनलाया येथे जाेरदार वादळ सुटले. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे तसेच कवेलू उडाले. झिंगानूर-येडसिली मार्गावरील ...

झिंगानूरला वादळाचा तडाखा
सिराेंचा तालुक्यातील झिंगानूर व वेनलाया येथे जाेरदार वादळ सुटले. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे तसेच कवेलू उडाले. झिंगानूर-येडसिली मार्गावरील विद्युत खांब काेलमडले. येथील उपपाेलीस स्टेशनमध्ये असलेल्या झाेपड्यांचे छत उडाले. तसेच प्राथमिक आराेग्य केंद्रातील तात्पुरत्या शेडवरील टिनपत्रे उडाले. प्राथमिक आराेग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती हाेत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात येथे लाकडी फाटे ठाेकून शेड निर्माण करण्यात आले हाेते. परंतु, वादळाने सदर शेडचेही नुकसान केले. झिंगानूर, झिंगानूर चेक नं. १ व २ तसेच वेनलाया गावात वादळामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी सदर नुकसानीचे पंचनामे तलाठ्यांमार्फत करण्यात आले. यावेळी सरपंच नीलिमा मडावी, पाेलीस पाटील भारत मडावी, विज्जी मडावी आदी उपस्थित हाेते. नुकसानग्रस्तांना लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
हे आहेत नुकसानग्रस्त
झिंगानूर येथे वादळामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले. परंतु, काही लाेकांच्या घरांना जाेरदार फटका बसला. झिंगानूर चेक नं. १ मधील सुरेश मडावी यांचे ४५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये १२ हजारांचे सिमेंट पाेल, १२ हजारांचे फाटे, १९ हजार ८०० रुपयांचे टिन आदींचा समावेश आहे. समय्या मडावी यांचे १३ हजार रुपयांचे टिन व १० हजार रुपयांच्या अन्नधान्याचे वादळाने नुकसान केले. डाॅ. पी. जी. मारबाेईनवार यांचे २६ हजारांचे टिन, २० हजारांचे फाटे व ३ हजार ५०० रुपयांचे माेठे फाटे असे एकूण ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले. मुल्ली मडावी यांचे कवेलू उडाल्याने ७ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले. पाेचा गावडे यांचे २२ हजारांचे टिन उडाले व २ हजार ८०० रुपयांचे फाटे माेडताेड झाले. झिंगानूर चेक नं. २ मधील रमेश दुर्गम यांचे १३ हजार रुपयांचे टिन उडाले. वेनलाया येथील चंद्रशेखर उईके यांच्या घरातील १ हजार ८०० रुपयांचे सिमेंट खांब माेडले तर ६ हजार ६०० रुपयांच्या फाट्यांचे तसेच २ हजार रुपयांचे अन्नधान्य व ८ हजार रुपयांचा टी.व्ही. आदींचे नुकसान झाले. उईके यांचे एकूण १८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले.
===Photopath===
140521\14gad_4_14052021_30.jpg
===Caption===
झिंगानूर येथे वादळाने टिनपत्रे अशाप्रकारे उडाल्याने नागरिकांचे नुकसान झाले.